
कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ज्या ज्या मशिदींवरील भोग्यांचा आवाज अधिक आहे त्या संदर्भात आम्ही काही पोलीस ठाण्यांमध्ये लेखी तक्रारी दिल्या होत्या. या संदर्भात कोणत्याही पोलीस ठाण्याकडून अद्याप कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. तरी यावर काहीच कारवाई होणार नसेल, तर हा न्यायालयाचा अवमान असून त्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटना आंदोलन उभे करतील, अशी चेतावणी हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर करण्यात आलेल्या आंदोलनात देण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन अपर चिटणीस स्वप्नील पोवार यांनी स्वीकारले.
या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, श्री. हिंदूराव शेळके, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आशिष लोखंडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, सर्वश्री किरण कुलकर्णी, नितीन काकडे, कैलास दीक्षित, रामभाऊ मेथे, प्रतिक डिसले, अदित्य आरेकर, तसेच अन्य उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे मशिदीवरील भोंगे काढा ! – हिंदु एकता आंदोलनाची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने

सांगली – मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे मशिदीवरील भोंगे काढा, या मागणीसाठी हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारीसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री. नितीन शिंदे, सर्वश्री दत्तात्रय भोकरे, विष्णु पाटील, परशुराम चोरगे, सोमनाथ गोटखिंडे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, प्रदीप निकम, नारायण हांडे, अविनाश मोहिते, सुजित राजोबा यांसह अन्य उपस्थित होते.