शासकीय जागेतील मशिदीचे अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करणार्‍यांवर कारवाई करा !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांच्यावर येऊ नये. सरकारी यंत्रणांनी स्वतःहून यावर कारवाई करणे आवश्यक !

न्यायमूर्तींची रेल्वेत गैरसोय : अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून रेल्वे विभागाला नोटीस !

न्यायमूर्तींसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीची इतकी गैरसोय होत असेल, तर सर्वसामान्य लोकांवर काय परिस्थिती ओढवत असेल ?, याचा विचारच न केलेला बरा !

जिल्‍हा परिषदेच्‍या अखत्‍यारीतील ८० शाळा शिक्षकांविना !

जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांची स्‍थिती अशी का ? शाळेमध्‍ये शिक्षकच नाहीत, ही स्‍थिती गंभीर आहे. अशा स्‍थितीमुळेच जिल्‍हा परिषदेच्‍या शाळा बंद पडत आहेत, हे लक्षात घेऊन त्‍यावर त्‍वरित उपाययोजना काढणे आवश्‍यक !

मुंबईतील ६६३ रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’च नाही !

उदय सामंत म्हणाले, ‘‘राज्यातील सर्वच रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ ९० दिवसांत करण्यात येईल.’’ मागील काही वर्षांत राज्यात वसई, भंडारा, अमरावती आदी जिल्ह्यांत रुग्णालयांत आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

गोवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळा !

इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळावा, ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा, या मागण्या म्हापसा येथे संपन्न झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केल्या.

गोवा येथील कला अकादमीच्या खुल्या प्रेक्षागृहाच्या रंगमंचाचे छत कोसळले : नागरिकांमध्ये संताप

निविदा न काढता नूतनीकरणाचे काम हाती घेतल्याने हे काम प्रारंभापासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. व्यासपिठावरील अनेक पुरातन आणि दर्जेदार प्राचीन साहित्याची मोठी हानी झाली आहे.

पुण्‍यातील १ सहस्र ३८५ ग्रामपंचायतींमध्‍ये मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक !

संमत निधीचा विकासकामांसाठी वापर होत नसेल, तर निधी का घेण्‍यात येत आहे ? यासाठी संबंधितांची चौकशी करून कारवाई करणे आवश्‍यक आहे.

फिरते हौद बंद करून मूर्तीदान केंद्राची संख्‍या वाढवण्‍याचा पुणे महापालिकेचा धर्मद्रोही निर्णय !

फिरते हौद, मूर्ती संकलन केंद्र, दान केंद्र यांसारख्‍या अशास्‍त्रीय गोष्‍टींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्‍यापेक्षा पालिकेने भक्‍तांना वहात्‍या पाण्‍यात मूर्ती विसर्जनास प्रोत्‍साहन दिल्‍यास श्री गणेशाची कृपा होईल !

हिंदूंना अंधारात ठेवून प्रशासनाने कराची (पाकिस्तान) येथील १५० वर्षे जुने मंदिर पाडले !

पाकिस्तानातील हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदुद्वेष्ट्या पाकिस्तानी सरकारला आता भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी जाब विचारायला हवा, असेच हिंदूंना वाटते !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे विजेचा धक्का लागल्याने ५ कावड यात्रेकरूंचा मृत्यू, तर १६ जण घायाळ

विद्युत् विभागाच्या अधिकार्‍यांच्या निष्काळीपणामुळे घटना घडल्याचा आरोप