धुपखेडा (जिल्हा संभाजीनगर) येथील साई मंदिरात चोरी

संभाजीनगर-पैठण रस्त्यावरील धुपखेडा येथील प्रसिद्ध असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरात २३ नोव्हेंबरच्या पहाटे चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली. यामध्ये साईबाबांच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट, २ दानपेट्या आणि मंदिराच्या कपाटातील सोन्या-चांदीचे अलंकार चोरट्यांनी पळवले आहेत.

वेळेत दोषारोपपत्र सादर न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास मोर्चा काढू ! – मनसेची चेतावणी

सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे

वीजदेयकांचा गोंधळ !

महावितरण शासकीय असल्याने ते खासगी आस्थापनाप्रमाणे ग्राहकांना लुबाडण्याची शक्यता अल्प आहे; परंतु येथे मानवी चुकांचे प्रमाण अधिक असल्याने ग्राहकांना मनस्ताप भोगावा लागत आहे. अशा चुका करणार्‍या कर्मचार्‍यांवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई झाली, तरच त्या चुका अल्प होऊ शकतात.

निवृत्तीवेतन धारकांची पायपीट !

निवृत्तीवेतन घेणार्‍यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाने सर्व प्रकरणांची चौकशी करून निवृत्तीवेतन धारकांना न्याय द्यावा आणि कामचुकारपणा करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यावी, ही अपेक्षा !

सावंतवाडी नगरपालिकेच्या आयुर्वेदिक आणि क्षयरोग चिकित्सालयाला नगराध्यक्षांनीच टाळे ठोकले !

डॉ. मसुरकर वेळेत उपस्थित नसल्याने रुग्ण ताटकळत असल्याचे निदर्शनास आले.

ख्रिस्ती संघटना ‘लव्ह जिहाद’ला विरोध कधी करणार ?

कोची (केरळ) येथील सायरो मलबार चर्चच्या येथील कदवंथरा सेंट जोसेफ चर्चमध्ये मुसलमान तरुण आणि ख्रिस्ती तरुणी यांचा विवाह झाला होता. यावरून झालेल्या वादामुळे विवाह करून देणार्‍या पाद्य्राला क्षमा मागावी लागली.

देहलीमध्ये कोरोनामुळे होणार्‍या वाढत्या मृत्यूंमुळे अंत्यसंस्कारांसाठी स्मशानामध्ये जागाच नाही !

देहलीमध्ये कोरोनामुळे १ सहस्र ४०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक मृतदेहांना स्मशानामध्ये जागा नसल्याने अंत्यसंस्कारापासून थांबवून ठेवण्यात आले आहे.

गोव्यात कोरोनाग्रस्त राज्यांतील पर्यटक आल्यामुळे गोमंतकियांना धोका !

कळंगुट समुद्रकिनार्‍यावर असलेल्या पर्यटकांच्या गर्दीत ना मास्कचा वापर, ना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन !

कॅसिनो चालू करण्याची अनुज्ञप्ती त्वरित मागे घ्या !

शासनाने तरंगते कॅसिनो बंद न केल्यास कॅसिनोंच्या कार्यालयांसमोर तीव्र निदर्शने करण्यात येतील

पाकच्या ‘आय.एस्.आय.एस्.’शी संबंध असलेल्या ‘पी.एफ्.आय.’वर गोव्यात बंदी का नाही ? – प्रा. सुभाष वेलींगकर

प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ केली आहे.