बांदा (सिंधुदुर्ग) प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे भरा, अन्यथा आंदोलन करणार ! – शीतल राऊळ, माजी सभापती, पंचायत समिती, सावंतवाडी

जनतेच्या आरोग्याशी निगडित समस्येसाठी आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ?

शिवभोजन थाळीचे ९ लाख ५० सहस्र रुपये अनुदान थकीत !

सातारा जिल्हा पुरवठा विभागाने सातारा जिल्हा परिषद उपाहारगृहातील शिवभोजन थाळीचे ९ लाख ५० सहस्र रुपये थकवले आहेत. या अनुदानासाठी उपाहारगृह व्यवस्थापकांनी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे

जेजुरी (पुणे) येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम मंत्री येणार नसल्याने रहित झाल्यामुळे प्रशासनाचे २ कोटी रुपये वाया !

३ वेळा कार्यक्रमाचा दिनांक पालटूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहू न शकल्याने पुरंदर जिल्ह्यातील जेजुरी येथे १३ जुलै या दिवशीचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) बसस्थानकाच्या दुरवस्थेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

बसस्थानकाची एवढी दुरवस्था झाल्याचे एस्.टी. महामंडळाला अन्य कुणीतरी का दाखवून द्यावे लागते ? महामंडळ काय करत आहे ?

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची दयनीय स्थिती

शिरवल नदी ते कोलझर नदी या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे  रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता ? हाच प्रश्न निर्माण होत आहे. त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला ‘रस्ताबंद’ आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.

सक्षम अग्नीसुरक्षा यंत्रणा हवी !

विविध शासकीय कार्यालये आणि शासकीय इमारती यांमध्ये अद्ययावत् अग्नीशमन व्यवस्था सुस्थितीत का नाहीत ? शासनाच्या महत्त्वाच्या धारिकांकडे पराकोटीचे दुर्लक्ष का ? अनेक वर्षांपासून ‘फायर ऑडिट’ झालेले नसल्याचे काही घटनांत जिल्हाधिकार्‍यांनी या वेळी मान्य केले.

गड-दुर्गांचे पावित्र्य जपण्यासाठी धुडगूस घालणार्‍या पर्यटकांना चेतावणी देणार्‍या सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांचे अभिनंदन !

गड–दुर्ग ही पर्यटन स्थळे नव्हेत, तर क्षात्रवीरांची तीर्थस्थळे आहेत, हे लक्षात घ्या. गडांचे पावित्र्य राखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना चेतावणी द्यावी लागते , हे प्रशासनाला लज्जास्पद !

वर्तमान राजकीय परिस्थितीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे संपूर्ण देशात हसे केले ! – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

जिल्ह्यातील नाणारचा प्रकल्प ५ दिवसांत बारसूला हालवला जातो. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला लागणारी जमीन ५ दिवसांत कुठून मिळाली? आज अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात लुटमार चालू आहे.

सिंधुदुर्ग : शिक्षक मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा झाराप येथील पालकांचा निर्धार !

पालकांना असा निर्णय घ्यावा लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ?

सिंधुदुर्ग : प्राथमिक शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक नेमण्यास वाढता विरोध

राज्यात अनेक डी.एड्. आणि बी.एड्. पदवीधारक बेरोजगार असतांना प्राथमिक शाळांमधून सेवानिवृत्त शिक्षकांना नेमण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, तसेच नवीन शिक्षक भरती होईपर्यंत या बेरोजगार युवकांना संधी मिळावी.