पुणे – गतवर्षी कोट्यवधी रुपये व्यय करूनही ‘फिरत्या विसर्जन हौद’ या उपक्रमाला पुणेकरांनी प्रतिसाद दिला नाही. यात केवळ १० टक्के गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचे पाहून महापालिका प्रशासनाने यंदापासून हे ‘फिरते हौद’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र मूर्ती विसर्जनाकरता लोखंडी हौद आणि मूर्तीदान केंद्र यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले.
यंदा प्रशासनाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी शाडू माती किंवा चिकण मातींपासून सिद्ध केलेल्या गणेशमूर्ती खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे; मात्र या मूर्ती नदीमध्ये विसर्जित होऊ नयेत म्हणून; मूर्तीदान केंद्र आणि कृत्रिम हौद यांची निर्मिती करण्यावरही महापालिकेचा भर दिसून येत आहे.
संपादकीय भूमिका :
|