समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नागरिक यांची सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदनाद्वारे मागणी !

मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये मलटण येथील श्री हरिबुवा मंदिराजवळील महतपुरा पेठ या ठिकाणी ‘सिटी सर्व्हे क्रमांक १६२’ या शासकीय जागेत अतिक्रमण करून मशीद बांधण्यात आली. (अशी मशीद बांधेपर्यंत प्रशासन काय करत होते ? – संपादक) ती हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने २७ जुलै २०१३ या दिवशी शासकीय निर्णयानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला होता; मात्र या निर्णयाला १० वर्षे होऊनही यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केलेली नाही. (न्यायालयाचा आदेश न मानणार्या प्रशासनातील संबंधित कायदाद्रोही अधिकार्यांवर कारवाई करा ! – संपादक) त्यामुळे प्रशासनाने त्याची कार्यवाही करावी, यासाठी १९ जुलै या दिवशी फलटण येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नागरिक यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भेटून निवेदन दिले. त्यावर देसाई यांनी ‘यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवून कारवाई करतो’, असे आश्वासन दिले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट, आशिष कापसे, तसेच डॉ. निंबाळकर, मंगेश खंदारे आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा –
♦ शासकीय जागेतील मशिदीचे अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करणार्या अधिकार्यांवर कारवाई करा !
https://sanatanprabhat.org/marathi/671909.html
संपादकीय भूमिकावास्तविक अशी मागणी करण्याची वेळी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांच्यावर येऊ नये. सरकारी यंत्रणांनी स्वतःहून यावर कारवाई करणे आवश्यक ! |
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग