रसायनमिश्रित पाणी सोडल्यामुळे विहिरीमध्ये आढळले मृत मासे !

अशी मागणी जनतेला पुन:पुन्हा का करावी लागते ? खरेतर प्रदूषण नियंत्रण मंडळानेच या समस्येवर ठोस उपाययोजना काढायला हवी !

हिंदु मुलींची हत्या करणार्‍या लव्ह-जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून होत असलेल्या भीषण हत्यांची मालिका संपलेली नसल्याचे दिल्लीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणानंतर पुन्हा एकदा देशासमोर आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या धर्मांधाला अटक !

अशा गोष्टींसाठी पोलिसांना निवेदन द्यावे का लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? ‘निवेदन दिले नसते, तर पोलीस गप्पच बसले असते’, असेच हिंदूंना वाटते !

सडामिर्‍या (रत्नागिरी) येथे वीर सावरकरांचा स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी

रत्नागिरीमध्ये सडामिर्‍या येथे स्वातंत्र्यवीर सावरकर ये-जा करत असत. त्याच ठिकाणी ‘ने मजशी ने परत मातृभूमीला’ या काव्यपंक्ती स्तंभावर लिहिल्या होत्या , हा स्तंभ सद्य:स्थितीत या ठिकाणी दिसत नाही.

लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे धर्मांधाने ठेवले टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे ‘स्टेटस’

महाराष्ट्रात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उघडपणे उदात्तीकरण करण्याच्या घडलेल्या या घटना, म्हणजे हिंदूंचे दमन करून दंगली भडकवण्याचे जिहाद्यांचे हे सुनियोजित षड्यंत्रच ! सरकारने अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला पाहिजे !

मराठी, कोकणी आणि संस्कृत वगळण्याचा निर्णय मागे घ्या ! – ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’ची मागणी

आतापर्यंत असलेले त्रिभाषा अन् द्विभाषा सूत्रांचे उच्चाटन करून इंग्रजी ही एकमेव भाषा टिकवून ठेवून कोकणी, मराठी, संस्कृत, उर्दू आदी भारतीय भाषा राज्यातून नाहीशा करण्याचा निर्णय गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाने घेतला आहे.

शेवगाव (नगर) दंगलीतील जिहादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी ! – विश्व हिंदु परिषद

दंगल घडवण्यासाठी ज्या समाजकंटकांनी दगडफेक केली, त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी आणि या घटनेमागचा सूत्रधार कोण आहे ? याचा शोध घ्यावा, अशा मागणीचे निवेदन नगर जिल्हा विश्व हिंदु परिषदेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले आहे.

१७ मे या दिवशी आजरा येथे जाणार्‍या ६९ मुलांच्या प्रकरणी सखोल चौकशी करा ! – सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन

१७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात घेऊन जाणार्‍या ६९ अल्पवयीन मुलांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी कह्यात घेतला.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन थांबवण्याची मनसेची मागणी

चिरे खाणीसाठी एका भूमीचा अहवाल दाखवून दुसर्‍याच भूमीत चिर्‍यांचे उत्खनन चालू आहे. या दोन्ही भूमींचा सातबारा वेगवेगळा आहे. एका व्यक्तीच्या अनुमतीवर एकाहून अधिक चिर्‍यांच्या खाणी चालू आहेत.

विमा आस्‍थापनांकडून रिक्‍शाचालकांची लूट !

विमा आस्‍थापनांकडून ‘थर्ड पार्टी इन्‍शुरन्‍स’च्‍या नावाने अनेक रिक्‍शाचालकांची लूट केली जात आहे. नियमाप्रमाणे विम्‍यासाठी वार्षिक केवळ २ सहस्र रुपयांची रक्‍कम भरायची असतांना रिक्‍शाचालकांना वार्षिक ७ सहस्र रुपये देणे बंधनकारक केले आहे.