अवैधपणे होणारी अमली पदार्थ विक्रीच्या विरोधात तातडीने कारवाई करा अन्यथा आंदोलन !

प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? खरे तर प्रशासनानेच स्वत:हून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करायला हवी !

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात मुसलमानांकडून शिवपिंडीवर हिरवी शाल चढवण्याचा प्रयत्न !

हिंदू सहिष्णु असल्याने ते वैध मार्गाने विरोध करतील; मात्र शासनकर्ते कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का ? हा प्रश्न उरतोच !

‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त करा ! – भाजप सांस्कृतिक आघाडी

लव्ह जिहाद’चे वास्तव मांडणारा ‘द केरल स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, तसेच हा चित्रपट जिथे जिथे प्रदर्शित झाला आहे, तिथे तिथे चित्रपटगृहांना संरक्षण मिळावे, अशा मागणीचे निवेदन भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने मिरज तहसीलदार यांना देण्यात आले.

बार्शी टाकळी (अकोला) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्‍याला विरोध करणार्‍या ९ धर्मांध नगरसेवकांचे निलंबन करा !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्‍याच्‍या विषयावर विचारविनिमय होऊ नये, यासाठी काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेससह वंचित आणि अपक्ष अशा ९ धर्मांध नगरसेवकांनी विरोध दर्शवला.

गोवा : गोसेवक तथा शेतकरी कार्यकर्ता हनुमंत परब यांचे नाव पोलिसांच्या गुन्हेगारी सूचीतून वगळा !

गुन्हेगारी सूचीत त्यांचे नाव समाविष्ट करण्याची कृती ही त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे आणि हे दु:खद आहे. श्री. हनुमंत परब यांनी मागील अनेक वर्षे समाजात जे चांगले कार्य केले आहे, त्या कार्याचा हा अवमान आहे.

आरोपींचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी !

सुनावणीस कोल्हापूर न्यायालयात गेलो असता माझ्या गाडीचा पाठलाग करणे, न्यायालयातून बाहेर येतांना जोरदार घोषणा देणे, माझ्या गाडीवर दगडफेक करणे, असे प्रकार झालेले आहेत.-अधिवक्ता समीर पटवर्धन

रत्नागिरीतील अनधिकृत मजार १५ दिवसांत हटवा ! – मनसेची जिल्हाधिकार्‍यांना चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? ही अनधिकृत मजार उभी राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अनधिकृत मजार उभारणार्‍यांसह त्यास उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई करा !

पुणे महापालिकेतील १३२ कनिष्ठ अभियंत्यांचे स्थानांतर ! 

येथील महापालिकेमध्ये वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणार्‍या १३२ कनिष्ठ अभियंत्यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले. त्यामध्ये स्थापत्य पदावरील १०९, विद्युत् पदावरील १७ आणि यांत्रिकी पदावरील ६ अभियंत्यांचा समावेश आहे.

सातारा जिल्हा काळी-पिवळी टॅक्सी, जीप आणि टुरिस्ट, वाहतूक संघटना यांची १७ एप्रिलला उपोषणाची चेतावणी !

येथील जिल्हा काळी-पिवळी टॅक्सी, जीप आणि टुरिस्ट, वाहतूक संघटनेने शासनाच्या प्रवासी वाहतुकीविषयी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात वाहनांसह १७ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषण करणार असल्याची चेतावणी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

नाशिक पुणे मार्गे मंडणगड एस्.टी. बससेवा कायमस्वरूपी चालू करा !

नाशिक पुणे मंडणगड बससेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्यात आल्यास ओझर येथील विघ्नहर गणपति येथे जाण्यासाठी मोठी सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच एस्.टी. महामंडळाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्येत वाढ होईल.