सातारा, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – भारतीय माजी नौदल अधिकार्यांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्याची कार्यवाही होण्याची दाट शक्यता आहे. भारत सरकारने या माजी नौसैनिकांची सुटका करावी, अशी मागणी ‘सातारा जिल्हा माजी नौसैनिक असोसिएशन’ने निवेदनाद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. याविषयीचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांना देण्यात आले आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, कतारच्या सर्वाेच्च न्यायालयाने ८ माजी नौदल अधिकार्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेवर कतार सरकारकडून कार्यवाही होण्याची शक्यता आहे. हे भारतियांसाठी धक्कादायक आहे, तसेच या शिक्षेमुळे संबंधित नौसैनिकांची कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहेत. भारत सरकारने या माजी नौसैनिकांची सुटका करण्यासाठी प्रभावी राजनैतिक आणि न्यायिक हस्तक्षेप करावा. भारतीय सैन्यदलाच्या सर्वोच्च प्रमुख म्हणून राष्ट्रपतींनी भारत सरकारला योग्य त्या सूचना द्याव्यात.