मिरज (जिल्हा सांगली), २८ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील वंटमुरे कॉर्नर येथे मराठा आंदोलकांनी कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या वाहनांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखवले. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. मंत्री खाडे यांना आरक्षणाविषयी वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांनी याविषयी विधीमंडळात आवाज उठवला नसल्याविषयी निषेधही करण्यात आला. मंत्री खाडे यांचे २८ ऑक्टोबरचे सर्व कार्यक्रम रहित करावे, असे आंदोलकांनी सांगितले.
*Sangli Breaking : सांगलीत मंत्री सुरेश खाडे यांचा ताफा अडवला; मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवत निषेध*https://t.co/I0lF4d2Iy8 pic.twitter.com/LujWoemJbB
— Tarun Bharat News (@tbdnews) October 28, 2023
शासनाकडून आरक्षणाचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत खाडे यांना जिल्हाबंदी करण्यात आल्याचे आंदोलकांनी घोषित केले. येथून पुढे सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना जिल्हाबंदी करण्यात येणार आहे, असे ‘मराठा क्रांती मोर्चा’चे राज्य समन्वयक विलासराव देसाई यांनी सांगितले.