कोल्हापूर बसस्थानकावर गुजराती समाजाच्या वतीने पाणपोई ! 

कोल्हापूर बसस्थानकावर चालू करण्यात आलेल्या पाणपोईप्रसंगी विविध मान्यवर

कोल्हापूर – कोल्हापूर बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी गुजराती समाजाच्या वतीने पाणपोई चालू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ‘भारत डेअरी’चे श्री. प्रकाश मेहता, कोल्हापूर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. अनील म्हेत्तर, कोल्हापूर आगाराचे बसस्थानक प्रमुखसुरेश शिंगाडे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर बसस्थानकावर गुजराती समाजाच्या वतीने चालू करण्यात आलेल्या पाणपोई

सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन देऊन वाचा फोडण्यात आली होती !

या संदर्भात सुराज्य अभियानाच्या वतीने कोल्हापूर विभाग नियंत्रकांना कोल्हापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेच्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यात कोल्हापूर शहर बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याचे नळ तुटलेल्या अवस्थेत आहेत, तेथील जागा अत्यंत अस्वच्छ आहे. पिण्याच्या पिण्यासाठी या ठिकाणी भांडे अथवा अन्य काही उपलब्ध नाही, तसेच शेजारील पाणीपोई बंद अवस्थेत आहे, असे नमूद केले होते. यावर विभाग नियंत्रकांनी ‘यावर उपाययोजना काढू’, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुजराती समाजाच्या वतीने पाणपोई ही पाणपाई चालू करण्यात आली आहे.