कोल्हापूर – उदयनिधी स्टॅलीन, ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ४ नोव्हेंबरला ५० हिंदूंनी तक्रार दिली आहे. या तक्रारी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी स्वीकारल्या. या तक्रारी वरिष्ठ स्तरावर पाठवून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले. या अगोदर कोल्हापूर जिल्ह्यात राजवाडा पोलीस ठाणे, हुपरी पोलीस ठाणे आणि जयसिंगपूर शहर अशा ३ तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत.
तक्रारी प्रविष्ट करणार्यांमध्ये प्रामुख्याने बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. पराग फडणीस, श्री. प्रथमेश मोरे आणि श्री. विक्रांत कोकाटे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव आणि श्री. लग्मण्णा नाईक, अखिल भारत हिंदू महासभेचे श्री. संदीप सासणे, धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे यांसह ५० जणांचा समावेश आहे.