Mamata Accuses Center and BSF : (म्हणे) ‘बांगलादेशी आतंकवाद्यांना प्रवेश देऊन बंगाल अस्थिर करण्याचा कट !’

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या संदर्भात पुरावे देणे आवश्यक आहे. जर त्यांच्याकडे पुरावे असतील, तर जनता त्यावरून सरकार आणि सीमा सुरक्षा दल यांना जाब विचारेल !

B’deshi Infiltrator Becomes TMC Panchayat Sarpanch : बंगालमध्ये घुसखोर मुसलमान महिला बनली ग्रामपंचायतीची सरपंच !

हे तृणमूल काँग्रेस सरकारला लज्जास्पद ! बांगलादेशी घुसखोरांना सरकारांकडून साहाय्य मिळत असेल, तर अशा घुसखोरांना बाहेर कोण काढणार ?

Bengal Teacher Scam : शिक्षक भरतीत अनियमितता आढळून आली, तर कारवाई का केली नाही ? – सर्वोच्च न्यायालय

गेंड्याच्या कातडीच्या सरकारांना न्यायालयांनी कितीही फटकारले, तरी त्यांच्यावर कधीही आणि काहीही परिणाम होत नसतो ! त्यांच्यावर कडक कारवाई करणेच आवश्यक असते. असे जेव्हा होईल, तेव्हाच जनतेला खर्‍या अर्थाने कायद्याचे राज्य मिळेल !

TMC Minister Terror Inducing Statement : (म्हणे) ‘आज आपण अल्पसंख्य असलो, तरी एकेदिवशी आपण बहुसंख्य होऊ !’

राज्य सरकारमधील एक मंत्री उघडपणे असे विधान करतो, यावरून त्यांची या संदर्भात सिद्धता असणार, हे स्पष्ट होते. सर्वधर्मसमभावाच्या गुंगीत असणारे हिंदू आतातरी शुद्धीवर येतील, अशी अपेक्षा !

TMC MLA HUMAYUN KABIR : बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संतापजनक घोषणा !

या देशातील मुसलमानांचा किंवा हुमायूं कबीर यांचा बाबर कोण होता ?, असा प्रश्‍न विचारणे आता आवश्यक झाले आहे. बाबरला जे स्वतःचे वंशज मानत आहेत, त्यांना बहुसंख्य हिंदूंच्या देशात आमदार होण्याची संधी मिळते, हे हिंदूंना लज्जास्पद आहे !

बांगलादेशी हिंदूंना परत आणण्‍यासंबंधी भारतातील केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करावा !

भारतातील धार्मिक स्‍वातंत्र्य धोक्‍यात आल्‍याचे खोटे अहवाल वेळोवेळी जारी करणार्‍या संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या कथित समित्‍यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्‍या विरोधात मात्र पूर्ण मौन धारण केले आहे.

Mamta Banerjee On Bangladeshi Hindu : बांगलादेशात शांतीसेना पाठवावी !

बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही शांतीसेना पाठवून हिंदूंचे रक्षण करून बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना हाकलणे, तसेच जिहादी आतंकवाद्यांची नांगी ठेचणे आता आवश्यक झाले आहे !

बांगलादेशींची घुसखोरी भारताच्‍या सुरक्षेला सर्वात मोठा धोका !

घुसखोरांनी ममता बॅनर्जी यांच्‍या कृपेने बंगालच्‍या सीमावर्ती भागांत बस्‍तान बसवले आहे. यात शेकडो लोक हे गुन्‍हेगारी प्रवृत्तीचे असूनही ममता बॅनर्जी त्‍यांची पाठराखण करत आहेत.

Bengal Fake Voter IDs : बंगालच्‍या ११ विधानसभा मतदारसंघात समान अनुक्रमांक असलेली २५ सहस्र मतदार ओळखपत्रे

निवडणूक आयोगाला मतदार ओळखपत्र देतांना हे का लक्षात येत नाही ? आयोगाच्‍या कार्यपद्धतीत दोष आहे, हेच यातून लक्षात येते. अशामुळे देशाची सुरक्षाच धोक्‍यात येत आहे !

ED Raids : झारखंड आणि बंगाल राज्यांत ‘इडी’च्या १७ ठिकाणी धाडी !

यातून बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणात पोलिसांचे साटेलोटे असल्याची शक्यता दाट आहे, हेच म्हणता येईल. अशांविरुद्धही कठोर कारवाई झाली पाहिजे !