Mamata Banerjee On Bengal Riots : (म्हणे) ‘बंगालमध्ये दंगली भडकवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न !’

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये दंगली भडकवण्याचे प्रयत्न चालू आहेत. दंगली घडवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मणीपूरमध्ये काय घडले ? दंगली सामान्य लोक करत नाहीत, तर राजकीय पक्ष करतात. या जाळ्यात तुम्ही अडकू नका. बंगाल सरकार अल्पसंख्यांकांच्या पाठीशी आहे, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे रमझान ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

ममता बॅनर्जी यांनी मांडलेली सूत्रे –

१. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. नवरात्र चालू आहे. मी त्यासाठीही शुभेच्छा देते; पण कुणी अराजकता पसरवावी, हे आम्हाला अपेक्षित नाही. सामान्य लोक अराजकता पसरवत नाहीत; परंतु राजकीय पक्ष तसे करतात. ही लज्जास्पद गोष्ट आहे.

२. आम्ही सर्व धर्मांसाठी जीवन अर्पण करण्यास सिद्ध आहोत. अल्पसंख्यांकांचे रक्षण करणे, हे बहुसंख्यांकांचे कर्तव्य आहे आणि बहुसंख्यांकांसह रहाणे, हे अल्पसंख्यांकांचे कर्तव्य आहे. (प्रत्यक्षात असे बंगालमध्ये होत नाही, याविषयी ममता बॅनर्जी का बोलत नाहीत ? बंगालमध्ये अल्पसंख्यांक मुसलमान बहुसंख्य हिंदूंवर आक्रमणे करत आहेत, तसेच ते हिंदूंची धार्मिक स्थळे आणि सण यांना लक्ष्य करत आहेत, याविषयी ममता बॅनर्जी गप्प का आहेत ? – संपादक)

३. आम्हाला साम्यवादी आणि राम एकत्र असल्याबद्दल विचारण्यात आले. मला विचारण्यात आले की, मी हिंदु आहे का ? मी अभिमानाने म्हणाले की, मी हिंदु आहे मुसलमान, शीख, ख्रिस्ती आणि भारतीयही आहे. (एकतरी मुसलमान तो मुसलमानही आहे आणि हिंदुही आहे, असे सांगेल का ? आणि त्यानुसार वागेल का ? – संपादक) ते आमच्यात फूट पाडू इच्छितात. ते दंगली घडवू इच्छितात. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. मी तुमच्यासमवेत आहे, संपूर्ण सरकार तुमच्यासमवेत आहे. (बंगालचे सरकार मुसलमानांच्या समवेत आहे, तर हिंदूंच्या विरोधात, हे जगजाहीर आहे ! – संपादक)

४.  ‘सबका साथ, सबका विकास’ ही खोटी घोषणा आहे. आम्ही रामकृष्ण, विवेकानंद यांच्यावर विश्वास ठेवतो; (विवेकानंदांवर विश्वास ठेवणारे हिंदुविरोधी आणि देशविरोधी कदापि वागू शकत नाहीत. त्यामुळे ममता बॅनर्जी खोटे बोलत आहेत, हे स्पष्ट आहे ! – संपादक) पण आम्ही घोषणाबाजी करणार्‍या पक्षाने निर्माण केलेल्या धर्माच्या विरोधात आहोत. ते हिंदुविरोधी आहेत.

५. मी कुणालाही दंगल करू देणार नाही. (दंगली तर मुसलमान नेहमीच करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मालदा आणि मुर्शिदाबाद येथे त्या झाल्या आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा खोटारडेपणा लक्षात येतो ! – संपादक)

संपादकीय भूमिका

मुळात बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट काही वर्षांपूर्वीच लागू करणे आवश्यक असतांना अद्यापही ती न लागू होणे, हे भारतियांचे दुर्दैव आहे. केवळ हिंदुविरोधी नाही, तर देशविरोधी कारवायांना बंगालचे तृणमूल काँग्रेस सरकार साहाय्य करत आहेत, हे गेली अनेक वर्षे समोर येत असतांना राष्ट्रपती राजवट लागू न होणे, हे अनाकलनीय आहे !