हिंदु संघटनेच्या श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी अनुमती नाकारली !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोलकाता (बंगाल) – यावर्षी श्रीरामनवमीची मिरवणूक काढण्यासाठी ‘अंजनी पुत्र सेने’चे आवेदन (अर्ज) हावडा पोलिसांनी फेटाळला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये याच मार्गावर मिरवणुकीच्या वेळी धार्मिक हिंसाचार झाला होता, ज्यामुळे ते एक संवेदनशील क्षेत्र मानले गेले आहे. (अशी अनुमती नाकारायला पोलीस भारताचे आहेत कि पाकिस्तानचे ? हिंसाचार धर्मांधांच्या उद्दामपणामुळे, ममता सरकारच्या मुसलमानांच्या लांगूलचालनामुळे आणि पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे झाला. त्यात हिंदूंचा काय दोष ? बंगालमध्ये धर्मांधांकडून आतापर्यंत अनेक वेळा पोलीस ठाणीही जाळण्यात आली आहेत; म्हणून ती बंद केली का ? – संपादक) वर्ष २०२३ मध्येही त्याच कारणास्तव अनुमती देण्यात आली नव्हती.

१७ एप्रिल २०२४ या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी कोलकाता उच्च न्यायालयाने घातलेल्या अटींचे उल्लंघन करण्यात आल्याचा दावाही पोलिसांनी केला. आयोजकांना दोन पर्यायी मार्ग सुचवण्यात आले असले, तरी मूळ मार्गाला अनुमती देण्यात आली नाही.

रस्त्यावरील नमाजपठणावर प्रशासनाला अडचण येत नाही; मात्र श्रीरामनवीला येते ! – अंजनी पुत्र सेना

या निर्णयावर आक्षेप घेत ‘अंजनी पुत्र सेने’चे संस्थापक-सचिव सुरेंद्र वर्मा म्हणाले की, प्रशासन प्रतिवर्षी याच हेच कारण पुढे करून श्रीरामनवमीची मिरवणूक थांबवण्याचा प्रयत्न करते. ते म्हणाले, ‘ईदच्या दिवशी लोक रस्त्यावर नमाजपठण करतात, ते प्रशानाला चालते; पण जेव्हा श्रीरामनवमी येते तेव्हा प्रशासनाला अडचणी येतात. आम्ही पोलिसांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये रावण राज्य असल्याने तेथे याहून वेगळे काय घडणार ?