खासगी शाळांमधील शुल्क ठरवण्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करणार ! – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

विनाअनुदानित शाळेचे शुल्क किती असावे ? हे राज्यशासन ठरवत नसल्याने विनाअनुदानित शाळांमधील शुल्काच्या संदर्भात अनेक तक्रारी राज्यशासनाकडे येत असतात. येणार्‍या काळात याविषयी स्थापन करण्यात आलेली समिती काम करेल.

तरुणीकडून बलपूर्वक वेश्याव्यवसाय करवून घेणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा

अशांना भर चौकात फाशी देण्याची तरतूद कायद्यात असणे आवश्यक !

मुलाला कॉपी पुरवणार्‍या वडिलांना पोलिसांनी दिला चोप !

राज्‍यात दहावी-बारावीच्‍या परीक्षा चालू आहेत. यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे राज्‍यात कॉपीमुक्‍त अभियान राबवण्‍यात येत आहे. असे असतांनाही काही ठिकाणी सर्रासपणे कॉपी चालू असल्‍याच्‍या घटना समोर येत आहेत.

खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंगावरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्याविषयी भाजपने संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत केलेल्या हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. याविषयी २ दिवसांत चौकशी सभागृहात निर्णय देऊ, अशी घोषणा अध्यक्षांनी केली.

संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्‍यांचा गदारोळ !

संजय राऊत सत्ताधार्‍यांविषयी म्हणाले, ही बनावट शिवसेना आहे. डुप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नव्हे, हे चोरमंडळ आहे.

डॉक्टर स्पर्श न करता रुग्णांची तपासणी करू शकत नाही ! – केरळ उच्च न्यायालय

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची वैद्यकीय तपासणी करणार्‍या डॉक्टरला मारहाण केली होती. डॉक्टरने पत्नीशी गैरवर्तन केल्याचा आरोप या व्यक्तीने केला होता. या व्यक्तीला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षड्यंत्र आहे का ? याची चौकशी व्हावी ! – हिंदु जनजागृती समिती

या दुर्घटनेच्या निमित्ताने प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी आणि कणेरी मठ यांची अपकीर्ती केली जात आहे. त्यामुळे कणेरी मठातील गायींच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यामागील षड्यंत्र उघड करायला हवे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संपूर्ण हिंदु समाज कणेरी मठाच्या पाठीमागे उभा आहे.

‘पेड न्यूज’प्रकरणी भाजपच्या अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस !

अश्विनी जगताप यांच्याविषयीची एक बातमी ‘न्यूज पोर्टल’ आणि एका साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आली होती. हे एकूणच लिखाण ‘पेड न्यूज’सारखे असल्याचे एम्.सी.एम्.सी. समितीच्या निदर्शनास आले होते.

पोर्तुगालच्या चर्चमध्ये ४ सहस्र ८१५ मुलांचे पाद्रयांकडून लैंगिक शोषण !

आरोपी असणारे १०० हून अधिक पाद्री अद्यापही पदावर कायम ! ‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’, अशीच जगभरात त्यांची प्रतिमा निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये !

‘व्‍हॅलेंटाईन डे’ला विरोध कुणाचा ?

देशात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना झाल्‍यावर अधिकृतपणे हिंदु संस्‍कृतीच्‍या विरोधातील गोष्‍टी थांबवता येऊ शकतात. त्‍यात ‘व्‍हॅलेंटाईन डे’ हाही असणार, यात शंका नाही. एकेक गोष्‍ट रोखण्‍यात श्रम करण्‍यापेक्षा थेट हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यासाठी श्रम घेतले, तर ते खर्‍या अर्थाने सार्थकी लागतील !