संयम पाळणे, ही हिंदु संस्कृती आहे, धांगडधिंगा नव्हे ! – शरद उपाध्ये, लेखक आणि राशीचक्रकार

देवाच्या सणांचे निमित्त करून धांगडधिंगाच घातला जातो. सवाष्ण, कुमारिका या स्वरूपात स्त्रीचा आदर करणे आणि तिला मातृस्वरूपात बघणे, ही उदात्तता दिसतच नाही. धुंद गरबा, मेजवान्या, उत्तमोत्तम ड्रेस आणि उत्तान नृत्य हा आपला आनंद झाला. यात देवीची सेवा कुठे आहे ?

श्री गणेशमूर्ती विसर्जनातील अक्षम्य चुका !

आता काही दिवसांवर नवरात्र आहे. त्यात युवावर्गाचा सहभाग अधिक असतो. गणेशोत्सवात पहायला मिळालेला अयोग्य भाग नवरात्रोत्सवात पहायला मिळू नये आणि उत्सवात धार्मिकता असावी, थिल्लरपणा नकोच, हेच या निमित्ताने सांगणे !

सामाजिक भान विसरलेली हिंदी चित्रपटसृष्टी !

हिंदी चित्रपटसृष्टीला शिखरावर पोचवण्यात महत्त्वाचे योगदान देणार्‍यांचीही आता दुसरी किंवा तिसरी पिढी सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. ‘वाडवडिलांनी दिलेला वारसा टिकवता आला नाही, तरी त्यांचे नाव धुळीला मिळवण्याचे काम केले नाही म्हणजे झाले’, असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे !

गांधी आणि गांधीवादी !

जे हातात आहे, तेच राखायला काँग्रेसला जमत नसतांना ‘भारत जोडो’सारख्या यात्रा करून काय साध्य होणार आहे ? ‘भारत जोडो यात्रा करून संघाला संपवणार’, अशी भाषा काँग्रेसने केली. संघ सध्या भक्कम स्थितीत आहे; मात्र त्याला संपवण्याची भाषा करणार्‍या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे.

पिंपरी (पुणे) येथील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून हत्या !

पैसे आणि प्रेमप्रकरणामुळे लहान मुलाची हत्या केली, यातून समाज दिवसेंदिवस किती निर्दयी आणि स्वार्थी होत आहे, याचे हे उदाहरण ! या प्रसंगातून समाज नीतीवान होण्यासाठी धर्मशिक्षणाचीच आवश्यकता किती आहे, हे पुन्हा अधोरेखित होते !

किडनी प्रत्यारोपणातील अपहाराच्या चौकशीला ४ मासांनंतरही विलंब !

याविषयी एका मासात अंतरिम अहवाल देण्यात येईल. यामध्ये रुग्णालयाचा सहभाग आढळल्यास त्यांची मान्यता रहित करण्यात येईल, तसेच डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल.

चोपडा येथील ‘पोद्दार इंटरनॅशनल’ ही अनधिकृत शाळा बंद करण्यासंदर्भात गट शिक्षणाधिकार्‍यांकडून नोटीस !

पोद्दार शाळेने वेगळ्या उद्देशाने हा वातावरण दूषित करणारा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे शाळेचे विश्‍वस्त, तसेच संबंधित शिक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

अवैधरित्या सिलिका वाळूचे उत्खनन केल्याच्या प्रकरणी वाघेरी येथील खाण आस्थापनाला टाळे

नितेश राणे यांच्या तक्रारीनंतर जागे झालेल्या प्रशासनाला हे आधीच का लक्षात आले नाही ?

निपाणी (कर्नाटक) येथे रास्त भाव दुकानातील ६०० किलो तांदूळ जप्त !

हरिनगर येथून संशयित अझरुद्दीन अकबर मुजावर हा रास्त भाव दुकानात विकल्या जाणार्‍या दुकानातील तांदूळ विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती आहार निरीक्षक गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार गायकवाड यांनी धाड टाकून त्याच्याकडून ६०० किलो तांदूळ जप्त केला.

बीड जिल्ह्यात पुन्हा अवैध गर्भपात; पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद !

पहिली मुलगी असल्याने दुसरी मुलगी नको म्हणून सासरच्या लोकांकडून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.