देशात तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये ८२ टक्के घट ! – केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती

‘इतिहासात १ ऑगस्ट या दिवसाची नोंद ‘मुस्लिम महिला अधिकार दिवस’ म्हणून झाली आहे. देशात ‘मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा’ अस्तित्वात आल्यापासून तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये ८२ टक्के घट झाली असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.

अफगाणी आणि रोहिंग्या मुसलमान स्वीकारत आहेत ख्रिस्ती धर्म !

भारत हा बहुसंख्य हिंदूंचा देश आहे, तर हिंदु धर्म स्वीकारून भारताचे नागरिकत्व मिळवावे, असे अफगाणी आणि रोहिंग्या मुसलमान यांना वाटले नाही, हे लक्षात घ्या ! अशांपासून भारताने सावध रहाणे आवश्यक !

(म्हणे) ‘…मग राममंदिराचे भूमीपूजनही प्रतिकात्मक करा !’ – खासदार इम्तियाज जलील, एम्.आय.एम्.

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व सण उत्सव साजरे करण्यावर शासनाने निर्बंध आणले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर राज्यशासनाने मुसलमानांना बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्याचे आवाहन केले आहे; मात्र याला एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे.

ऑक्सफर्डसह भारतीय लसीसाठीही सीरमचे संशोधन ! – सायरस पूनावाला

कोरोनावर ऑक्सफर्ड विद्यापिठातील लसीसह आणखी ४ लसींसाठी सीरम इन्स्टिट्यूटने करार केले आहेत. सीरमने भारतीय संशोधकांच्या साहाय्याने संपूर्ण भारतीय बनावटीच्या कोवॅक्स लसीवर काम चालू केले आहे. – सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष सायरस पूनावाला

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखलेचा लाभ घ्या !

राज्यातील १२ आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

काँग्रेस आणि मगोप यांनी राज्यातील एकूण १२ आमदारांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या अपात्रका याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात २४ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे.

गुजरात उच्च न्यायालयाच्या कामकाजाची तुलना जुगाराच्या अड्डयाशी करणार्‍या अधिवक्त्यावर कारवाई

गुजरात उच्च न्यायालयाने येथील अधिवक्त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता यतिन ओझा यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी कारवाई करत त्यांची ज्येष्ठता रहित केली.

कोरोनाच्या काळातही देशाचा विकास थांबला नाही ! – पंतप्रधान

मणिपूर येथे २३ जुलै या दिवशी केंद्र सरकारच्या ‘प्रत्येक घरी पाणी’, या योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा पार पडला. त्या पार्श्‍वभूमीवर ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून बोलत होते. ‘हा प्रकल्प म्हणजे रक्षाबंधनानिमित्त बहिणींना भेट आहे’, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

मेरठ येथे विवाहित हिंदु महिलेची तिच्या मुलीसह हत्या करून त्यांना घरात पुरणार्‍या शमशाद याला अटक

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
लव्ह जिहादच्या अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

जर्मनीतील एका राज्यात शाळेमध्ये बुरखा घालण्यावर बंदी

युरोपमध्ये अनेक लोकशाहीप्रधान देशांत अशी बंदी घालण्यात आली आहे, तर भारतात ती का घातली जाऊ शकत नाही ?