अफगाणी आणि रोहिंग्या मुसलमान स्वीकारत आहेत ख्रिस्ती धर्म !

नागरिकत्व सुधारणा कायद्याचा लाभ घेत भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न

  • भारत हा बहुसंख्य हिंदूंचा देश आहे, तर हिंदु धर्म स्वीकारून भारताचे नागरिकत्व मिळवावे, असे अफगाणी आणि रोहिंग्या मुसलमान यांना वाटले नाही, हे लक्षात घ्या ! अशांपासून भारताने सावध रहाणे आवश्यक !
  • भारतात अवैधपणे वास्तव्य करणारे रोहिंग्या हे देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत. भारतात घुसण्यासाठी रोहिंग्या घुसखोर कशा प्रकारे क्लृप्त्या काढतात, हेच यातून दिसून येते !
  • अशा प्रकारचे कायद्यातील पळवाटा शोधून भारताचे नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना भारतातून हकालपट्टी केली पाहिजे !

नवी देहली – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) संमत झाल्यानंतर अफगाणी आणि रोहिंग्या मुसलमान ख्रिस्ती धर्म स्वीकारत असल्याचे समोर आले आहे. भारतीय नागरिकत्व मिळवणे सुलभ जाणार असल्याने त्यांच्याकडून धर्मांतर केले जात आहे. सरकारी यंत्रणांच्या चौकशीमध्ये न्यूनतम २५ अफगाणी मुसलमानांनी आतापर्यंत या कारणासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे समोर आले आहे.

१. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान येथील पीडित हिंदु, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती यांना भारताचे नागरिकत्व मिळणे सुलभ होणार आहे.

२. दक्षिण देहलीतील अफगाण चर्चमध्ये जाणारे ३४ वर्षीय आबिद अहमद मॅक्सवेल गेली १३ वर्षे भारतात रहात आहेत. त्यांनी सांगितले की, ‘सीएए कायदा बनल्यानंतर अफगाणिस्तानमधील अनेक मुसलमान हे ख्रिस्ती धर्म स्वीकारू इच्छित आहेत. अनेक अफगाण्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तालयाकडे शरणार्थी म्हणून अर्ज केला आहे.