जर्मनीतील एका राज्यात शाळेमध्ये बुरखा घालण्यावर बंदी

युरोपमध्ये अनेक लोकशाहीप्रधान देशांत अशी बंदी घालण्यात आली आहे, तर भारतात ती का घातली जाऊ शकत नाही ?

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीतील बाडेन-वुर्टेमबर्ग राज्यातील शाळांमध्ये बुरखा घालण्यावर बंदी घालण्याचा आदेश सरकारने दिला. बुरखा घालून येणार्‍यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

१. जर्मनीतील अनेक खासदारांचे म्हणणे आहे की, ‘शिक्षण संस्थांमध्ये बुरखा घालण्यावर बंदी घालणे योग्य आहे’, तर काहींना भीती वाटते की, ‘यामुळे समाजामध्ये वाईट परिणाम होऊ शकतो.’

२. याच वर्षी फेब्रुवारी मासामध्ये एका १६ वर्षीय विद्यार्थिनीला नकाब घातल्यामुळे शाळेत प्रवेश नाकारला होता. त्यामुळे तिने न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने प्रशासनाला फटकारतांना या विद्यार्थिनीच्या बाजूने निकाल दिला होता. हे पहाता राज्य सरकारने आता कायदा बनवूनच बुरख्यावर बंदी घातली आहे.

३. बाडेन-वुर्टेमबर्गच्या शेजारी राज्य श्‍लेस्विग-होल्स्टीनमध्येही विश्‍वविद्यालय आणि महाविद्यालय येथेही बुरख्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तेथील साम्यवादी ग्रीन पार्टीने याचे समर्थन केले नाही.

४. वास्तविक युरोपमधील काही देशांमध्येच बुरख्यावर बंदी आहे. यात हॉलंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बुल्गारिया आणि डेन्मार्क यांचा समावेश आहे.