मेरठ येथे विवाहित हिंदु महिलेची तिच्या मुलीसह हत्या करून त्यांना घरात पुरणार्‍या शमशाद याला अटक

हिंदु असल्याचे सांगून हिंदु महिलेला ओढले होते प्रेमाच्या जाळ्यात

  • अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
  • लव्ह जिहादच्या अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे शमशाद याने हिंदु असल्याचे सांगून प्रिया या विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर तिची आणि तिच्या लहान मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी शमशाद याला अटक केली आहे. त्याने या दोघींना ठार मारून घरातच पुरले असल्याचेही उघड झाले. पोलिसांनी त्या दोघींचेही मृतदेह बाहेर काढून हे घर पाडून टाकले आहे.

१. शमशाद याने गाझियाबाद येथील प्रिया हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यावर ती तिच्या मुलीसह शमशाद याच्या मेरठ येथील घरी रहाण्यास आली होती. ती गेली ५ वर्षे शमशाद याच्यासह येथे रहात होते. शमशाद याने प्रिया आणि तिच्या मुलीचे नाव पालटले होते.

२. शमशाद हिंदु नाही, हे जेव्हा प्रिया हिला समजले, तेव्हा त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे त्याने २८ मार्च या दिवशी प्रिया आणि तिच्या मुलीची हत्या केली आणि त्या दोघींना घरातच पुरले.

३. दोघीही बरेच दिवस न दिसल्याने शेजार्‍यांना संशय आला. त्यांनी शमशाद याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने नीट उत्तर दिले नाही. त्यामुळे लोकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शमशाद याची अनेकदा चौकशी केली; मात्र त्यातून काहीच माहिती न मिळाल्याने अखेर त्याला कह्यात घेतले आणि त्याच्या घरात खोदकाम केले. तेव्हा दोघींचे पुरलेले मृतदेह आढळून आले.