लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर ‘सीबीआय’च्या धाडी !

केंद्रीय रेल्वेमंत्री असतांना भ्रष्टाचार केल्याचे आरोप !

पाटलीपुत्र (बिहार) – केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर धाडी घातल्या. त्यांच्या पत्नी राबडीदेवी आणि मुलगी यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या मासामध्येच लालूप्रसाद यांना झारखंड न्यायालयाकडून चारा घोटाळा प्रकरणी जामीन मिळाला होता.

(सौजन्य : IndiaTV)  

‘सीबीआय’ने सांगितले की, देहली, पाटलीपुत्र आणि गोपालगंज येथील ठिकाणांवर धाडी घालण्यात आल्या आहेत. यादव यांनी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्रीपदी असतांना लोकांना नोकर्‍या देण्यासाठी लाच म्हणून भूखंड स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सीबीआयच्या धाडींचा निषेध करत राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि कार्यकर्ते पाटलीपुत्रच्या रस्त्यावर उतरले.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचाराने पोखरल्याने झालेली भारताची दुर्दशा लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !