लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बरी होण्यासाठी त्यांची मुलगी रमझानच्या काळात रोजे (उपवास) ठेवणार !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या धार्मिक कृती करून स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात; मात्र भारतातील अन्य धर्मीय कधीही हिंदूंच्या धार्मिक कृतींचे पालन करून ते ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे कधीही दाखवत नाहीत, हे हिंदू कधी लक्षात घेणार ?

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव व मुलगी रोहिणी आचार्य 

पाटलीपुत्र (बिहार) – राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी यादव यांची प्रकृती बरी व्हावी आणि त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळावा, यासाठी रमझानच्या काळात रोजा (उपवास) ठेवणार असल्याचे ट्वीट करून सांगितले आहे. तसेच ‘चैत्र नवरात्रीही पूर्ण श्रद्धेने साजरी करणार आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे. (हिंदूंनी रोजे ठेवण्यावर टीका करू नये; म्हणून चैत्र नवरात्री साजरी करणार असल्याचे सांगण्याचा हा प्रयत्न आहे, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत ! – संपादक) चारा घोटाळ्याच्या प्रकरणी शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यांच्यावर देहलीतील एम्स् रुग्णालयात उपचार चालू आहेत.