‘ईडी’च्या धाडीतून लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या ६०० कोटी रुपयांच्या संपत्तीची माहिती उघड !

उजवीकडे लालूप्रसाद यादव

पाटलीपुत्र (बिहार) – राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबियांवर अंमलबजावणी संचालनालयाने (‘इडी’ने) घातलेल्या धाडीतून १ कोटी रुपयांची रोकड आणि ६०० कोटी रुपयांच्या अन्य संपत्तीची माहिती उघड झाली आहे. भूमीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या घोटाळ्याच्या प्रकरणी ही धाड घालण्यात आली. ईडीने लालूप्रसाद यादव, त्यांचे पुत्र तसेच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी आणि अन्य काही लोकांच्या देशातील १५ ठिकाणी ही धाड घातली होती. वर्ष २००४ ते २००९ या काळात लालूप्रसाद रेल्वे मंत्री असतांना हा घोटाळा झाला होता.

संपादकीय भूमिका 

देशातील राजकारणी किती भ्रष्ट असतात, हे लालूप्रसाद यादव यांच्या एका उदाहराणावरून लक्षात येते ! देशातील प्रत्येक भ्रष्ट राजकारण्याकडे किती पैसे असतील याची कल्पनाच करता येत नाही ! विशेष म्हणजे हा पैसा प्रामाणिकपणे त्यांच्याकडून जप्त करण्यासाठी देशात एकही नेता आणि प्रशासकीय अधिकारी नाही, हेही तितकेच सत्य आहे !