मंदिरे चालू करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभरात शंखनाद आंदोलन !

‘राज्यातील मंदिरे उघडावीत’, या मागणीसाठी भाजपच्या वतीने ३० ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावणी सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर राज्यात ठिकठिकाणी ‘शंखनाद आंदोलन’ करण्यात आले.

भारतातील समृद्ध वास्तूकला !

भारतात केवळ घरेच नव्हे, तर मंदिरे, राजवाडे, किल्ले हे वास्तूशास्त्राचा उपयोग करून बांधले जात. हे शास्त्र एवढे प्रगत होते की, त्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आवश्यकतेनुसार केलेली असायची.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची मालमत्ता जप्त करा ! – औद्योगिक न्यायालयाचा आदेश

मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम ! समितीच्या यापूर्वीच्या कारभारातही अनेक अपप्रकार आणि कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. हे रोखण्यासाठी देवस्थानांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवणे आवश्यक !

शासकीय संकेतस्थळावर श्री महालक्ष्मी देवीसह कोल्हापूर जिल्ह्यातील चुकीचे ऐतिहासिक संदर्भ : भाविकांमध्ये संतापाची लाट

जिल्हा प्रशासनाच्या वतीने kolhapur.gov.in या नावाने अधिकृत संकेतस्थळ चालवण्यात येते. या संकेतस्थळावर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची चुकीची माहिती देण्यात आली आहे.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत दर्शनासाठी खुले रहाणार !

दर्शनास येतांना ‘मास्क’ घालणे बंधनकारक असून भाविकांनी सुरक्षित अंतर ठेवून रांगेतून दर्शन घ्यावे. भाविकांनी सायंकाळी ६ नंतर मंदिर आणि मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव विजय पोवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून भाविकांसाठी कुंड खुले करा ! – सुनील घनवट, प्रवक्ते, श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती

श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास प्रारंभ होणे हा श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने दिलेल्या लढ्यातील एक विजय !

मनकर्णिका कुंडाच्या खोदकामात सापडलेल्या पुरातन वस्तू जमा करा !

‘खोदकामाच्या कालावधीत सापडलेल्या पुरातन वस्तू पुरातत्व विभागाकडे जमा कराव्यात’,

आजपासून करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव !

पहिल्या दिवशी सूर्याची किरणे थेट श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या चरणांवर पडतात.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

देवीचे मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून मंदिराच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करू त्यासाठी आवश्यक प्रस्ताव देवस्थान समितीला सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

श्री महालक्ष्मी मंदिरातील दुकानदारांकडून देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांचा सत्कार

सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे १ जानेवारीपासून ही दुकाने खुली करण्यास अनुमती देण्यात आली. त्यामुळे मंदिराच्या आवारातील दुकानदारांच्या शिष्टमंडळाने २ जानेवारी या दिवशी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.