श्री महालक्ष्मीदेवी मंदिर सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत दर्शनासाठी खुले रहाणार !
दर्शनास येतांना ‘मास्क’ घालणे बंधनकारक असून भाविकांनी सुरक्षित अंतर ठेवून रांगेतून दर्शन घ्यावे. भाविकांनी सायंकाळी ६ नंतर मंदिर आणि मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव विजय पोवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.