
कोल्हापूर, ७ ऑक्टोबर – नवरात्रोत्सवातील पहिल्याच दिवशी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात पूजेच्या ठिकाणी बाँब ठेवल्याचा निनावी दूरभाष पोलीस मुख्यालयात दुपारी ४ वाजता आला. हा दूरभाष आल्यानंतर तात्काळ भाविकांच्या दर्शनरांगा बंद करून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. बाँबशोधक पथक आणि श्वानपथक यांच्या साहाय्याने मंदिरात पडताळणी केल्यानंतर कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर भाविकांना पुन्हा दर्शनासाठी सोडण्यात आले. राज्यातील ७ ऑक्टोबरपासून सर्व मंदिरे उघडल्याने, तसेच श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी होती.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक