कोल्हापूर, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – नवरात्रात द्वितीयेला कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची माहेश्वरी रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली होती. शुंभ-निशुंभ दैत्यांच्या वधाच्या प्रसंगी रक्तबीज दैत्याचा संहार करण्यासाठी देवाची मूर्तीमंत शक्ती प्रकट झाली. त्या शक्तींना मातृका म्हणून ओळखले जाते. या मातृका मंडलापैकी भगवान शंकरांची अर्थात् महेश्वर यांची शक्ती म्हणजे माहेश्वरी होय. माहेश्वरीदेवीच्या हातामध्ये भगवान शंकराप्रमाणेच त्रिशूल, अक्षमाला अशी आयुधे आहेत. नंदी तिचे वाहन असून माथ्यावरती चंद्रकोर जटामुकुट, कपाळावर त्रिनेत्र अशी भगवती माता आहे.
जोतिबा देवाची द्विदल कमल पुष्पातील राजेशाही थाटामधील खडी सालंकृत महापूजा बांधण्यात आली होती.