श्री महालक्ष्मीदेवीच्या खजिन्यात ६४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची भर !

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या खजिन्यात आता आणखी ६४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची भर पडली आहे. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० पर्यंत देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरात दीड कोटी रुपयांची अत्याधुनिक ध्वनीयंत्रणा कार्यान्वित

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात दीड कोटी रुपयांची अत्याधुनिक ध्वनीयंत्रणा कार्यान्वित झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते या यंत्रणेचे लोकार्पण झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या यंत्रणेमुळे आवाज अधिक सुस्पष्ट आणि त्याच्या वैशिष्ट्यांसह येणार आहे.

श्री महालक्ष्मी मंदिराच्या शिखरावर ५ फूट उंचीचा १ हजार टनचा धोकादायक कोबा ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

५० वर्षांपूर्वी योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांनी मंदिरातील गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केला असेल. परंतु आता ही स्थिती अधिक धोकादायक वळणावर आली आहे !

श्री महालक्ष्मीदेवी, जोतिबासह मुख्य मंदिरांतील दर्शनाची वेळ वाढवली

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी, श्री जोतिबादेव, श्री दत्त भिक्षालिंग स्थानासह सर्व मंदिरांतील दर्शन वेळेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. ११ डिसेंबरपासून त्याची कार्यवाही चालू झाली आहे.

कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिर आणि श्री जोतिबा मंदिर आता ८ घंटे दर्शनासाठी खुली रहाणार

दर्शनासाठी www.mahalaxmikolhapur.com या संकेतस्थळावर फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन मिळणार ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

‘मंदिरे उघडल्यानंतर शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे भक्तांनी पालन करावे’, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत; कारण कोरोना महामारी अजून संपलेली नाही – हिंदु जनजागृती समिती