देहू येथे येणारे भाविक तीर्थ म्हणून पीत आहेत इंद्रायणीचे दूषित सांडपाणी !

सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे, याकडे कानाडोळा करणारे अधिकारी गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मात्र गणेशमूर्ती विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होते, असा कांगावा करतात.

मराठा साम्राज्याचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी ! – योगी आदित्यनाथ

महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याविषयी आमच्या घराण्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

मुंडे यांचा सत्कार करणार्‍यांवर तृप्ती देसाई यांची टीका

मुंडेचे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करायला ते पराक्रमी योद्धा आहेत का ?

राज्यात १२ घंट्यांत ३ सहस्र ६२ खासगी बसगाड्यांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई !

केवळ एका दिवसात अशी कारवाई न करता प्रादेशिक परिवहन विभागाने नियमितपणे नियमांचे वारंवार उल्लंघन करणार्‍या खासगी बसगाड्यांवर अशी कारवाई केली असती, तर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले नसते. 

आर्थिक अपव्यवहार आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याच्या प्रकरणी तत्कालीन विश्‍वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद करावा !

आर्थिक अपव्यवहार झाला असेल, तर संबंधितांना शिक्षा व्हायलाच हवी; मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्राशी निगडित विषयांत माननीय न्यायालयाने शंकराचार्य किंवा हिंदूंचे धर्मगुरु यांचे मत विचारात घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

उत्तरप्रदेशातील मदरशांना मिळणार्‍या सरकारी निधीतील घोटाळ्याची चौकशी होणार !

मदरशांना देण्यात येणारा सरकारी निधीच बंद का करत नाही ?

पाकिस्तान वर्ष २०२१ पाळणार ‘गाय वर्ष’ !

नुसते ‘गाय वर्ष’ पाळण्याऐवजी गोहत्या होणार नाहीत, यासाठी पाकने प्रयत्न केले म्हणजे मानता येईल !

देशभरात शेतकर्‍यांच्या ‘रस्ता बंद’ आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद

देहलीच्या सीमेवर ३ कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांनी देशभरात दुपारी १२ ते ३ या वेळेत ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.

ग्रेटा थनबर्ग हिने शेअर केलेल्या ‘टूलकिट’मध्ये शेतकरी आंदोलनामागे खलिस्तान्यांचा हात असल्याची माहिती

भारतामधील आंदोलनामागे परदेशातून हस्तक्षेप केला जातो, आंदोलन कसे करावे, याचे नियोजन केले जाते आणि त्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळत नाही आणि नियोजनानुसार हिंसाचार होतो, हे भारताला लज्जास्पद !

अमेरिका चीनची आव्हाने स्वीकारणार ! – राष्ट्रपती जो बायडेन यांची स्पष्टोक्ती

आम्ही चीनकडून होणार्‍या आर्थिक शोषणाचा सामना करू. मानवाधिकार, बौद्धीक संपदा आणि जागतिक शासन यांवर चीनकडून होणारी आक्रमणे अल्प करण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करू.