मुंडे यांचा सत्कार करणार्‍यांवर तृप्ती देसाई यांची टीका

तृप्ती देसाई व धनंजय मुंडे

नगर – मुंडेचे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करायला ते पराक्रमी योद्धा आहेत का ?, असा प्रश्‍न भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. तसेच परिवार संवाद कार्यक्रम घेणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मंत्र्यांचे परिवार सुरक्षित आहेत का ?, तेही पहावे, असे म्हणत मुंडे यांचा सत्कार करणार्‍यांवर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती; मात्र काही काळानंतर सदर महिलेने तक्रार मागे घेतली. त्यामुळे मुंडे यांचे जल्लोषात स्वागत आणि सत्कार होऊ लागले. आता दुसर्‍या महिलेने मुंडे यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे ते पुन्हा अडचणीत आले आहेत. हा धागा पकडून देसाई यांनी पुन्हा मुंडे यांच्यावर टीका केली आहे.