दर्शनासाठी येणार्या भाविकांचे आरोग्य धोक्यात !
|
देहू – लाखो भक्त देहू नगरीमध्ये संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात. काही वारकरी इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून दर्शन घेण्यासाठी जातात, तर काही तीर्थ म्हणून इंद्रायणीचे पाणी प्राशन करतात; मात्र देहूतील इंद्रायणी नदीचे पावित्र्य तीर्थक्षेत्र म्हणून राहिलेले नाही; कारण अनेक वर्षांपासून येथील इंद्रायणी नदीमध्ये ४ ओढ्यांचे सांडपाणी मिसळले जात आहे. यामुळे इंद्रायणी नदीतील जैवविविधतेला, तसेच माशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. शासकीय अधिकारी, प्रशासन यांनी त्वरित लक्ष घालून तुकाराम बीजपर्यंत इंद्रायणी नदीत येणारे सांडपाणी थांबवावे, नाहीतर नदी संवर्धनावर काम करणारे पर्यावरणवादी उपोषण करतील, अशी चेतावणी नदी संवर्धनासाठी उपक्रम राबवणार्या सोमनाथ मसुडगे यांनी दिला आहे.
देहू आळंदी पर्यावरण विकास समितीने इंद्रायणी घाटाची जी दुरावस्था झाली आहे, तेथेही लक्ष घालून तो घाट व्यवस्थित करावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.