निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या भावामुळे पुनर्प्रसारणाच्या वेळीही लोकप्रिय ठरलेली ‘रामायण’ मालिका !

या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या अन् मालिकेशी जोडल्या गेलेल्या कलाकारांच्या मालिकेप्रती असलेल्या भावामुळे ही मालिका कोणत्याही काळात दाखवली, तरी लोकांना तेवढीच आवडेल !

खानापुरातील एका चौकाचे ‘टिपू सुलतान चौक’ असे केलेले नामकरण पालटा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे बांधकाम खात्याला निवेदन

खानापूर शहरातील एका चौकाचे ‘टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. या नामकरणाला भाजप, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विरोध केला आहे. कर्नाटक सरकारने टिपू सुलतानची जयंती बंद केली असून त्याच्याशी संबंधित इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकला आहे.

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील सुनावणी १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली  

श्रीकृष्ण विराजमानसह ८ याचिकाकर्त्यांची याचिका न्यायालयाने स्वीकारून नोटीस दिली

हिंदु साम्राज्याची व्याप्ती !

मध्य अशियापर्यंत समुद्रगुप्तांचे हिंदु साम्राज्य पसरलेले नव्हते का ? ‘अशोकाचे काबूल, गझनी आणि कंदहारपर्यंत साम्राज्य होते ना ! दक्षिणेला वेलोरपर्यंत, ईशान्येला कामरूप’, असा हा भारत होता.

युद्धातील कुशल नेतृत्वाचे महत्त्व

भारत-चीन युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याची स्थिती चांगली नव्हती. भारताकडे अतिशय जुनी शस्त्रे होती. भारताकडे सेन्च्युरीयन आणि शेरमान बनावटीचे रणगाडे होते. ते दुसर्‍या महायुद्धात वापरले गेले होते.