आपली पाठ्यपुस्तके निरूपयोगी आणि पूर्णपणे दिखावा करणारी !  

अभिनेत्री कंगना राणावत यांचे पंडित नथुराम गोडसे यांचे समर्थन करणारे ट्वीट !

कंगना राणावत

मुंबई – प्रत्येक गोष्टीला ३ बाजू असतात. एक तुमची, एक माझी आणि एक खरी. चांगली गोष्ट सांगणारा ना बंधनात असतो, ना काही लपवतो आणि म्हणूनच आपली पाठ्यपुस्तके निरूपयोगी आहेत. पूर्णपणे दिखावा करणारी, असे ट्वीट अभिनेत्री कंगना राणावत यांनी ३० जानेवारी या दिवशी म. गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी केले. यामध्ये पंडित नथुराम गोडसे यांचे छायाचित्रही तिने पोस्ट केले होते.

या पोस्टद्वारे कंगना राणावत यांनी भारतात विद्यार्थ्यांना शिकवणारा इतिहास चुकीचा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.