गोवा : केरी तपासणी नाक्यावर ११ लाख रुपये किमतीचे गोमांस कह्यात

पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सय्यद इस्माईल मरचोनी (रहाणारा पेडणे) याला कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे. गोरक्षकांना मिळते ती माहिती पोलिसांना मिळत नाही का ?

गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालून नृत्य करण्यास लावले !

अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !

हिंदु एकता आंदोलनाच्‍या वतीने गणेशोत्‍सव मंडळांच्‍या स्‍वागतप्रसंगी ‘हिंदु राष्‍ट्र आक्षेप आणि खंडण’ ग्रंथ भेट !

हिंदु एकता आंदोलनाच्‍या वतीने अनंतचतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्‍सव मंडळाच्‍या स्‍वागतासाठी कक्ष उभारण्‍यात आला होता. या स्‍वागत कक्षावर मंडळातील अध्‍यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शाळ, श्रीफळ आणि हिंदु जनजागृती समितीचा ‘हिंदु राष्‍ट्र आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट देण्‍यात आला.

ओढ्याचे पाणी न्‍यून झाल्‍याने बाहेर आलेल्‍या श्री गणेशमूर्तींचे श्रीराम सेना हिंदुस्‍थानच्‍या वतीने पुनर्विसर्जन !

शास्‍त्रानुसार कृती करणार्‍या श्रीराम सेना हिंदुस्‍थानच्‍या कार्यकर्त्‍यांचे अभिनंदन !

नाशिक येथे जनजागृतीमुळे भाविकांकडून श्री गणेशमूर्तींचे वहात्‍या पाण्‍यात विसर्जन !

येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने नाशिक पंचवटी येथील लक्ष्मीनारायण घाटावर श्री गणेशमूर्ती विसर्जन वहात्‍या पाण्‍यात करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले होते. हातात फलक धरून जनजागृती करण्‍यात आली.

सिंधुदुर्ग ते मुंबई ‘शिवशौर्य यात्रा’ : उद्या दोडामार्ग येथून प्रारंभ

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने आणि पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गोवा : बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील धर्मांतराचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

प्रोफेट बजिंदर सिंग संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘लंगर’ सेवेच्या नावाखाली बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. पोलिसांनी कारवाई करून धर्मांतर करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला.

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा ! – कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारेयांना तात्काळ अटक करण्यात यावी.

३० सप्‍टेंबरला दादर येथे ‘मंदिर-संस्‍कृती रक्षण’ सभेचे आयोजन !

‘प्राचीन भारतीय मंदिर संस्‍कृती’चे रक्षण व्‍हावे, राष्‍ट्र, हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांवर होणार्‍या आघातांना संघटितपणे विरोध करण्‍यासाठी दिशादर्शन व्‍हावे, यासाठी गौड सारस्‍वत ब्राह्मण टेंपल ट्रस्‍ट, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ३० सप्‍टेंबरला दादर येथे ‘मंदिर-संस्‍कृती रक्षण’ सभेचे आयोजन केले आहे.

आसिफने लावले हिंदु संघटनांच्या नावे मुसलमानांना धमकी देणारे फलक !

गुरुग्राममध्ये विश्‍व हिंदु परिषद (विहिंप) आणि बजरंग दल यांना अपकीर्त करण्याचे मुसलमानांनी रचलेले षड्यंत्र उघड झाले आहे. येथील आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाने विहिंप आणि बजरंग दल यांच्या नावाने शहरात फलक  लावले.