कोल्हापूर – धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, द्रमुकचे खासदार ए. राजा आणि त्याचे समर्थन करणारे कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.
१. शाहूवाडी येथे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती श्री. सर्जेराव पाटील, श्री. रमेश पडवळ, माजी नगरसेवक श्री. महेश कोठावळे, सर्वश्री दिलीप गुरव, जितेंद्र पंडित, विजय भारमल, बाबूराव पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
२. गडहिंग्लज येथे प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार विष्णु बुट्टे यांनी निवेदन स्वीकारले. २१ गणेशोत्सव मंडळे आणि २ ग्रामपंचायती यांनी हलाल अर्थव्यवस्था रहित व्हावी, यासाठी त्यांच्या वतीने पत्र दिले.
३. चंदगड येथे तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीराम सेना-हिंदूराष्ट्र सेना तालुकाध्यक्ष श्री. महांतेश देसाई, तालुका उपाध्यक्ष श्री. तुकाराम मरगाळे, ‘न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन’चे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री. नारायण बालापगोल, सर्वश्री श्रीपाद जोशी, संदीप सुतार, दयानंद पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री, तसेच अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
२ ग्रामपंचायती, ‘श्री अष्टविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, अडकूर’, ‘श्री रवळनाथ सार्वजनिक गणेश मंडळ अडकूर’, ‘न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन’ शाखा चंदगड, श्रीराम सेना-हिंदूराष्ट्र सेना (तालुका चंदगड) यांसह २० गावांतील ५०० जणांनी निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.