हिंदू संघटित झाल्यास तिरुपतीसह अनेक मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील ! – बी.के.एस्.आर्. अय्यंगार, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, आंध्रप्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

हिंदूजागृती करणारे कीर्तन हवे !

‘मुलांचा अधिकाधिक वेळ भ्रमणभाषचा वापर करण्यात जातो. त्यामुळे भावी पिढी बरबाद (वाया) होत असून मुलांना थोडे तरी संप्रदायाचे शिक्षण द्या, किमान धर्म वाचवण्याकरता सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे’, असे मार्गदर्शन ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांनी पुणे येथे पार पडलेल्या कीर्तनामध्ये व्यक्त केले.

नाशिक येथील सप्तशृंगी देवस्थानच्या व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन !

‘सप्तशृंगी देवस्थान व्यवस्थापन कोणत्याही कामांमध्ये स्थानिकांना विचारात घेत नाही’, ‘व्यवस्थापनाकडून वेळोवेळी मनमानी कारभार केला जातो’, अशा स्वरूपाचे आरोप आहेत.

त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील देणगी दर्शन ऐच्छिक ! – उच्च न्यायालय

देवाला दर्शनासाठी भक्तांचे पैसे नाही, तर त्यांचा भाव हवा असतो’, हेच हिंदूंना ज्ञात नसल्याने ते पैसे देऊन लवकर दर्शन घेण्याच्या मागे लागतात ! हिंदूंची ही दयनीय स्थिती पालटण्यासाठी त्यांना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हेच यावरून लक्षात येते !

प्रशासकीय नियोजनशून्यतेमुळे वारकर्‍यांच्या पदरी उपेक्षाच !

आषाढी-कार्तिकी वारीच्या काळात विविध योजनांसाठी, वारकर्‍यांना सुविधा देण्यासाठी, तसेच वर्षभरही कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होतो; मात्र त्याचा वारकर्‍यांना प्रत्यक्ष लाभ किती होतो ?, याविषयी भलेमोठे प्रश्‍नचिन्हच आहे.

मठाच्या मंदिरावर कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय रहित !

आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचा हिंदुद्वेषी वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकारला दणका !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा !

तेलंगाणा राज्यातील धर्मादाय विभागाने त्याच्या वारंगळ येथील ३ मजली कार्यालयाच्या बांधकामासाठी ३ मंदिरांना प्रत्येकी १ कोटी रुपये देण्यास सांगितले आहे.

नवरात्रोत्सवात श्री महालक्ष्मी मंदिरात शुल्क भरून प्रत्येक घंट्याला १ सहस्र भाविकांना दर्शन घेता येणार !

नवरात्रोत्सवाच्या काळात श्री महालक्ष्मी मंदिरात शुल्क भरून प्रत्येक घंट्याला १ सहस्र भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. मुख्य दर्शन रांगेला कुठेही अडथळा न आणता ही व्यवस्था करण्यात येणार आहे. देवस्थान समितीने ‘सशुल्क दर्शन’ योजना आखली आहे.

नवरात्रोत्सवात भाविकांना २०० रुपये देऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन चालू करण्याचा देवस्थान समितीचा विचार !

पैसे देऊन देवतेचे दर्शन चालू करणे हे इतरांवर अन्यायकारक नव्हे का ? ‘देवीला भावभक्तीयुक्त अंत:करणाने दर्शन घेणे आवडेल कि पैसे देऊन दर्शनाला भाविक आलेले आवडेल ?’, याचा देवस्थान समितीने विचार करावा !