पंढरपूर – नारळाची सोडण मंदिर परिसरात टाकल्याने, तसेच नारळ फोडल्याने चिखल होण्याची शक्यता असल्याने भाविक घसरून कोणत्याही दुर्घटना होऊ नयेत, असे कारण पुढे करत प्रशासनाच्या वतीने फौजदारी संहितेच्या कलम १४४ अन्वये १ ते ३ एप्रिल या कालावधीत मंदिर आणि परिसरात नारळ वाढवण्यास, तसेच विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी जारी केले आहेत.
सौजन्य: Pandharpur Live News
याचसमवेत पंढरपुरात यात्रा काळात मांस-मटण विक्रीस मनाई करण्यात आली असून पशूवध करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचेही आदेश उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी जारी केले आहेत. (देवस्थान, तीर्थक्षेत्र परिसरात केवळ यात्रा काळातच मांस-मटण विक्रीस मनाई, तसेच पशूवध करण्यास बंदी का ? वास्तविक ही बंदी वर्षभरच असली पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|