‘फूड सिक्युरिटी आर्मी’साठी प्रशिक्षण चालू करावे ! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शेतमजूर नसल्याने सध्या शेतीखालील भूमी न्यून होत आहे. त्याचसमवेत शेतमजूर म्हणून काम करतांना कमीपणा वाटू नये; म्हणून त्यांना सैनिकांसारखे प्रशिक्षण द्यायचे.

संपादकीय : आत्मनिर्भरतेतून राष्ट्रवाद !

भारत आत्मनिर्भर होण्यासाठी उचलली गेलेली पावले हा नरेंद्र मोदी शासनाच्या दूरदर्शीत्वाचा परिणाम होय !

 रत्नागिरी कोकण कृषी विद्यापिठाचे तिळावरील पहिलेच संशोधन तिळाचे (‘कारळा’चे) नवीन वाण केले विकसित !

शेतकर्‍यांना प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या  या पिकाच्या उत्पादनाची पडताळणी चालू असून येत्या काही दिवसांतच शेतकर्‍यांना ‘कारळा’ हे नवीन वाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) तालुक्यात हत्तीमुळे लाखो रुपयांची हानी : ५ हत्तींचा कळपही पडला दृष्टीस !

अन्नाच्या शोधात हत्ती शेती आणि बागायती यांची हानी करत असून आता ते थेट लोकवस्तीत येऊ लागल्याने शेतकरी अन् ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षे हत्तींची समस्या न सुटणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

Viksit Bharat Sankalp Yatra:ग्रामीण भागांत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांचा जागर

शासकीय योजनांचा विविध लाभ मिळावा, या उद्देशाने हाती घेतलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यातील ग्रामीण भागांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

बाजारात तुरीला सरासरी १० सहस्र प्रतिक्विंटलचा भाव !

या वर्षी तूरडाळीचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा ३० टक्क्यांपर्यंत अल्प येण्याची शक्यता आहे. सध्या आफ्रिका आणि इतर देशांमधून तूरडाळ आयात केली जात आहे.

अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना ३ हेक्टरपर्यंत हानीभरपाई देणार !

राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना ३ हेक्टरपर्यंत हानीभरपाई देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. २९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारच्‍या धोरणाप्रमाणे सरकार उसाला दर देईल ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य

ऊस आंदोलन प्रकरणी सरकार केंद्र सरकारच्‍या धोरणाप्रमाणे सरकार उसाला दर देईल ! या संदर्भात जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती नेमली असून ऊस दर आंदोलनावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाऊर्जाने कार्यप्रणालीत सातत्‍य राखावे ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

‘पंतप्रधान कुसूम योजने’च्‍या अंतर्गत महाराष्‍ट्रात आतापर्यंत एकूण ७१ सहस्र ९५८ सौर पंप स्‍थापित करून देशात अग्रक्रम राखला आहे.

पीक विमा आस्‍थापनाच्‍या कार्यालयांची ठाकरे गटाच्‍या कार्यकर्त्‍यांकडून तोडफोड !

प्रशासनाच्‍या लेखी आश्‍वासनानंतर शिवसेना जिल्‍हाप्रमुख दातकर यांचे उपोषण मागे !