केंद्रशासन महाराष्ट्रातील २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार !

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती. यामुळे केंद्र सरकारकडून कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला.

मराठवाड्यात पावसाअभावी ३५ लाख हेक्‍टरवरील खरीपाची पिके धोक्‍यात !

अत्‍यल्‍प पावसामुळे मराठवाड्यातील खरीपाची उत्‍पादन क्षमता सरासरी ३५ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत घटण्‍याचा अंदाज आहे. पुढील ८ दिवसांत मुसळधार पाऊस न झाल्‍यास ३५ लाख हेक्‍टरवरील संपूर्ण खरीप पिके धोक्‍यात येण्‍याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य ! – मुख्‍यमंत्री

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य करता आले, अशी माहिती राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते मंत्रालयात स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने ध्‍वजारोहण करण्‍यात आले. त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्‍ट्राचे वर्ष २०२४-२५ पर्यंत २ सहस्र ७९५ मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे उद्दिष्‍ट !

राज्‍यात ५ प्रकल्‍पांची कामे वेगाने चालू आहेत. यामध्‍ये प्रत्‍येक प्रकल्‍पाची वीजनिर्मितीची क्षमता निश्‍चित करण्‍यात आली असून वर्ष २०२४-२५ पर्यंत टप्‍प्‍याटप्‍प्‍याने हे उद्दिष्‍ट पूर्ण करण्‍यात येणार आहे.

बोगस खतविक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

भिवंडी येथील त्रस्‍त शेतकर्‍याची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी खत पाण्‍यात न विरघळता प्‍लास्‍टिकचे गोळे सिद्ध होत असल्‍याचा अजब प्रकार !

शेतीची हानी करणार्‍या माकडांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना हवी ! – अविनाश काळे

सुरक्षित आणि भयमुक्त शेती हा शेतकर्‍यांचा अधिकार आहे. माकडे आणि वानरे यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. हानीभरपाई आकस्मित गोष्टीसाठी दिली जाते; मात्र माकडांचा त्रास हा आकस्मित नसून कायमस्वरूपी आहे.

५ सहस्र शेतकर्‍यांसाठी लवकरच जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

विविध योजनांद्वारे शेतकर्‍यांना लाभ देण्यात येत आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेच्या अंतर्गत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.

आंबा आणि काजू बागायतदारांचे २५ जुलै या दिवशी आंदोलन

शेत किंवा बाग यांमध्ये काम करत असतांना सर्पदंश, जंगली श्वापदे, झाडावरून पडणे, फवारणी करतांना विषबाधा, हृदयविकार इ. मुळे मृत्यू आल्यास दोन्ही विमा संरक्षण मिळावे.

आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करा !

गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, वादळे अशा नैसर्गिक आपत्ती आणि पालटत्या वातावरणामुळे आंबा अन् काजू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत.

राज्यात फळपीक विम्याची साडेचौदा सहस्र बोगस प्रकरणे !

सोलापूर जिल्ह्यात एकूण ४ सहस्र ४१३ विमा अर्जदारांपैकी २ सहस्र ७१३ बोगस विमा प्रकरणे, तर जळगाव जिल्ह्यात एकूण ७८ सहस्र ४३० विमा अर्जदारांपैकी १९ सहस्र ९७२ अर्जांची पडताळणी झाली असून १ सहस्र १४५ बोगस विमा प्रकरणे आढळून आली आहेत.