आचारसंहितेसाठी रासायनिक खतांच्या गोणीवरील पंतप्रधानांची छबी मिटवण्याचे कृषि विभागाचे आदेश

रासायनिक खतांची गोणी

नाशिक – रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छापण्यात आलेल्या प्रतिमांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याने कृषी विभागाने पंतप्रधान मोदी यांच्या गोण्यांवरील त्या छबीवर ब्रशद्वारे लाल रंग देऊन ती प्रतिमा खोडावी आणि नंतरच गोणी वितरीत करावी, अशा सूचना केली आहे. केंद्राने ‘एक राष्ट्र एक खत’ असे धोरण लागू केले होते. या धोरणानुसार ‘पृथ्वी रक्षणासाठी रासायनिक खतांचा संतुलित उपयोग करा’, अशा आशयाचे लिखाण आणि खतांसाठीच्या अनुदानाचा उल्लेख आणि पंतप्रधानांचे चित्रही आहे. रासायनिक खतांची आवश्यकता शेतकर्‍यांना जूनपासून भासणार आहे.