नाशिक – शेतकर्यांच्या नाशिक पातळीवरील ज्या समस्या आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी अतिशय जलद गतीने चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची कार्यवाहीही चालू झालेली आहे, असे वक्तव्य नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकर्यांना दिले.
माकप आणि किसान सभा यांचे गेल्या ८ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी येथे आंदोलन चालू आहे. शासन आणि त्यांच्यात आतापर्यंत ५ बैठका झाल्या आहेत. तरीही प्रश्न सुटलेला नाही. या पार्श्वभूमवर ते बोलत होते.
७५ टक्के विषय मार्गी लावण्याचा निर्णय झाला आहे !
भुसे पुढे म्हणाले की, आंदोलन चालू होण्याच्या पूर्वीच महसूल मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली होती. आंदोलकांच्या काही अशा मागण्या आहेत ज्या राज्य आणि केंद्र पातळीवरील आहेत. जवळपास ७५ टक्के विषय मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. जे.पी. गावीत आंदोलन मागे घेतील असा विश्वास आम्हाला आहे.