पिंपळखुंटा (छत्रपती संभाजीनगर) येथे बँकेने कर्ज न दिल्याने शेतकर्‍याची आत्महत्या !

करमाड – शेतकर्‍याची शेती गहाण खत करून ४-५ महिने झाले; परंतु बँक खात्यावर पैसे जमा करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने आणि पेरणीचे दिवस डोक्यावर आल्याने या तणावातून पिंपळखुंटा येथील शेतकरी विठ्ठल दाभाडे (वय ५२ वर्षे) यांनी शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुष्काळ पडल्याने शेतात पीक न आल्याने विठ्ठल दाभाडे यांनी उसनवारीचे पैसे देण्यासाठी एका खासगी बँकेकडे शेती तारण ठेवून कर्ज मागणी केली होती; मात्र बँकेच्या शाखाधिकार्‍यांनी त्यांच्या खात्यावर पैसे ठेवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या नैराश्यातून दाभाडे यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्याकडे सापडलेल्या एका चिठ्ठीत आत्महत्येचे कारण लिहिले आहे.