
पुणे – प्लास्टिकमुक्त गड होण्यासाठी उपाय म्हणून वन विभागाच्या वतीने शिवनेरीवर १२ सहस्र लिटर क्षमतेचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्लांट (आर्.ओ.) बसवण्यात येत आहे.
पर्यटकांना गडावर प्लास्टिकची बाटली न्यायची असल्यास त्याची रितसर नोंदणी करून ५० रुपये अनामत रक्कम भरून न्यावी लागणार आहे. गडावरून खाली आल्यावर बाटली परत दिल्यास त्यांची रक्कम परत दिली जाईल. शिवनेरी गडावर १२ सहस्र लिटर क्षमतेचा हा प्लांट असेल, तर पायथ्याला पिण्याच्या पाण्याच्या ५ टाक्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामधून पर्यटकांना पिण्याचे शुद्ध पाणी घेता येईल, असे जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.