बनावट रुग्ण दाखवून मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ४ लाख ७५ सहस्र रुपये उकळले !

  • आंबिवली (कल्याण) येथील रुग्णालयातील प्रकार !

  • तिघांच्या विरुद्ध गुन्हा नोंद

ठाणे – कल्याणजवळील आंबिवली येथील मोहने पूर्व भागात शिव निर्मल हाईट्स या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गणपति मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आहे. येथे संगनमत करून १३ रुग्णांच्या शस्त्रक्रिया आणि औषधोपचाराची बनावट कागदपत्रे सिद्ध करून मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २६ मे २०२३ ते १० जुलै २०२३ या कालावधीत ४ लाख ७५ सहस्र रुपये उकळण्यात आले. मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे साहाय्यक संचालक देवानंद धनावडे यांनी केलेल्या तक्रारीवरून फसवणूकप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रुग्णालयाचे डॉ. अनुदुर्ग ढोणी आणि प्रदीप बापू पाटील अन् ईश्वर पवार यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशांकडून फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम वसूल करायला हवी !