शाळेतील संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक !

पुणे – येथील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील जिल्हा परिषद, शासकीय, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि संबंधित शिक्षण अधिकारी यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना नमाजपठण करण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. स्थानिक दर्ग्यामध्ये शाळेतील हिंदु मुलांकडून नमाजपठण करून घेतले. दर्ग्यातील मौलानाने (इस्लामच्या अभ्यासकाने) हिंदु मुलांनी नमाजपठण केले म्हणून त्यांना आईस्क्रीमचे वाटप केले. शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना नमाजपठण करण्यास भाग पाडणारे मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर संबंधित शिक्षण अधिकारी (ज्यांनी या प्रकाराला अनुमती दिली असे सर्व जण) यांच्या विरोधात सर्व हिंदु धर्माभिमानी यांनी एकत्र येऊन जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. दोषी असलेल्या सर्वांचे तात्काळ निलंबन करावे आणि या प्रकरणाची सखोल अन् निःष्पक्ष चौकशी करण्यात यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, अशी चेतावणीही ग्रामस्थांनी दिली आहे. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ? पोलीस स्वत:हून कारवाई केव्हा करणार ? – संपादक) सासवड विभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
तक्रारीमध्ये म्हटले आहे की, शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना धार्मिक कार्यात सहभागी होण्यास भाग पाडणे, हे शिक्षणात धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण या प्रावधानांचे उल्लंघन करते. ज्या बेलसर गावात स्वातंत्र्याची पहिली लढाई झाली, अशा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गावात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही.
सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !
या विरोधात महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य ह.भ.प. योगेश बडदे महाराज, भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, तसेच ‘सरनौबत हंबीरराव मोहिते गोशाळे’चे अध्यक्ष श्री. पंडित दादा मोडक, युवा सेना जिल्हाप्रमुख, (शिंदे गट) पुणेचे तुषार हंभीरे यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, गोरक्षक पुणे जिल्हा, हिंदु जनजागृती समिती, तसेच सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या आहेत.
तुषार हंभीरे म्हणाले की, मुलांच्या कोवळ्या मनावर चुकीचे संस्कार करण्याच्या कृती जाणीवपूर्वक केली जात आहेत. लहान मुलांना भरकटवण्याचे काम केले जात आहे. याविषयी बैठकांच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. या विरोधात गृहमंत्र्यांकडेही तक्रार करणार आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य ह.भ.प. योगेश बडदे महाराज यांनी सांगितले की, हा प्रकार अत्यंत निंदनीय असून असा प्रकार परत संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात कुठेही घडू नये, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी दोषींवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.
जेजुरीच्या या पवित्र भूमीत इस्लामीकरणाचे षड्यंत्र ! – पंडित दादा मोडक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी भूमीवर झालेल्या पहिल्या लढाईत आमच्या स्वराज्याचे दुसरे सेनापती बाजी पासलकर, तसेच गोदाजी जगताप येथे धारातीर्थी पडलेले आहे. अशा पवित्र भूमीमध्ये या शाळेतील मुलांना त्या दर्ग्यावर नमाजपठण करण्यास भाग पाडले जात असेल, तर हा केवढा मोठा अपराध आहे ? सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद चालू असतांना या थडग्याविषयी असे प्रकरण उकरून काढण्यामागे यांचा नेमका हेतू काय आहे ? याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, तसेच हे थडगे हळूहळू वाढत चालले आहेत. याविषयी शासनाने चौकशी करावी, जेजुरीच्या या पवित्र भूमीत इस्लामीकरणाचे षड्यंत्र चालू आहे.
संपादकीय भूमिका
|