चौथी लाट !

कोरोनाच्या काळात नागरिकांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते. याच प्रयत्नांमध्ये त्यांनी सातत्य ठेवले पाहिजे. केवळ कोरोनाच नव्हे, तर कोणताही आजार होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते. व्यक्ती, समाज आणि देश हे तिघे आजारी असतील, तर ते कधीही प्रगती करू शकत नाहीत, हे प्रत्येक भारतियाने लक्षात ठेवले पाहिजे !

हिजाबवरून धर्मांधांचा उद्दामपणा !

‘द काश्मीर फाइल्स’ मधून सत्य मांडल्याविषयी दिग्दर्शकाला धमक्या मिळाल्यामुळे त्यांनाही ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ही परिस्थिती भयावह आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या भरवशावर हिंदू सुरक्षित जीवन जगू शकत नाहीत. हिंदूंनी व्यापक संघटन उभारून स्वरक्षणाचे धडे घेणे आणि इतरांना ते देणे, हा त्यावरील उपाय ठरेल !

आज हात, भविष्यात लाथ !

एकीकडे राजकीय प्रयत्न चालू असतांना दुसर्‍या बाजूला स्वत:चे संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करणे, हाही ‘एम्.आय्.एम्.’चा राजकीय अजेंडा राहील, हे निश्चित !

काँग्रेसची बुडती नौका !

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यावर लाखो भारतियांचे डोळे उघडले ! काँग्रेसचे खरे स्वरूप लोकांना कळण्यासाठी ‘द काँग्रेस फाइल्स’ असा चित्रपट कुणी बनवल्यास भारतियांना तिचे भयंकर स्वरूप कळेल आणि आम्ही ‘खलनायकाला आतापर्यंत नायक बनवण्याचा प्रयत्न केला’, याविषयी ते आत्मवंचना करतील, हे निश्चित !

श्रीलंकेवरील अन्नसंकट आणि भारत !

भारतामध्येही वर्षागणिक रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. श्रीलंका, भूतान या लहान देशांना जे कळते, ते आपल्यासारख्या महाकाय देशाला कधी कळणार ?

… ही लोकचळवळ व्हावी !

यातील देशविरोधी पात्राच्या तोंडी पुढील संवाद आहे, ‘देशातील शासन भले त्यांचे असले, तरी व्यवस्था ‘आमची’ आहे.’ इथेच सगळ्याचे मूळ आहे. ‘सध्याची प्रचलित आणि हिंदूंवरील अन्याय्य व्यवस्था दूर करणारी दुसरी सक्षम व्यवस्था निर्माण होणे’ हा सर्वंकष उपाय आहे’, हेच यावरून सिद्ध होते. ती व्यवस्था केवळ हिंदु राष्ट्रच देऊ शकते !

हिजाबप्रेमींना दणका !

यातून बोध घ्यायचा म्हणजे जसजसे हिंदूंचे संघटन वाढत आहे, हिंदू जागृत होत आहेत, तसतसे हिंदुविरोधी अधिक सतर्क होऊन काही ना काही निमित्त काढून धर्मांध कारवाया करत आहेत. न्यायालयही सत्य स्थिती पुढे आणत आहे. हिंदूंनीही संघटितपणे वैध मार्गाने वैचारिक प्रतिवाद करत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत संघर्ष करत राहिले पाहिजे !

युद्ध चालू आहे !

भारताने पोखरणमध्ये दुसर्‍यांदा अणूबाँबचे परीक्षण केल्यावर जगाने भारतावर, विशेष करून अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध घातले; मात्र त्याचा भारतावर विशेष काही परिणाम झाला नाही, ही वस्तूस्थिती आहे. तसेच रशियाचे झाल्यास आश्चर्य वाटू नये. रशियाकडे इंधन आणि गॅस हे हुकूमाचे एक्के आहेत. त्यांच्या बळावरच रशिया अमेरिका आणि युरोप यांना खेळवणार आहे, हे नक्की !

मरणासन्न काँग्रेस !

काँग्रेस आता शेवटची घटका मोजत आहे. ‘काँग्रेसला आता राजकीयदृष्ट्या संपवायचे’, असा निश्चय हिंदूंनी केला आहे. या निर्णयात ते पालट करणार नसल्यामुळे हा पक्ष लवकरच इतिहासजमा होईल, हे निश्चित !

आक्रमकांच्या स्मृती पुसाच !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी केली; परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही शासनकर्त्यांना ती पूर्ण करता आली नाही. आज त्याच शिवसेनाप्रमुखांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्यामुळे या सरकारच्या कारकीर्दीत तरी शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा आहे.