हिंदुद्वेषी ‘अल्-जजीरा’ !

भारत सरकारने ‘अल्-जजीरा’ची काळी बाजू वेळीच लक्षात घेऊन तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी. इस्लामी महत्त्वाकांक्षेच्या बळावर भारताची अपकीर्ती करणार्‍या ‘अल्-जजीरा’ला रोखठोक प्रत्युत्तर दिले तरच अन्य विदेशी प्रसारमाध्यमांकडून केल्या जाणार्‍या भारतविरोधी वृत्तांकनाला आळा बसेल !

हा हिंदुत्वाचा विजय !

देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागला. मतदारांचा एकूणच कल पहाता यंदाच्या निवडणुकीत आक्रमक आणि रोखठोक हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्व यांना बहुमत मिळाले आहे, असे सहजच दिसून येते.

हिंदूंच्या वंशविच्छेदाचे दडपलेले सत्य !

जगातील एकाही देशात आतंकवादाचे उदात्तीकरण होत नाही; पण भारतात मात्र ते सर्रासपणे होते. तेव्हा कुणीही अशा चित्रपटांना विरोध करत नाही. मग काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारलेल्या या चित्रपटालाच विरोध का ? हा दडपलेला इतिहास जगासमोर का येऊ दिला जात नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातच आहेत !

समाजात प्रस्थापित होणारे अयोग्य आदर्श ?

हिंदु धर्मासाठी प्राणत्याग करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे उदाहरण तर जगात अन्यत्र कुठेच नसेल ! हे असे आदर्श सोडून हिंदु समाज अयोग्य आदर्शांच्या मागे का धावत आहे ? याच्या मुळाशी गेल्यास लहानपणापासून धर्मशिक्षण नसणे, घरात आई-वडिलांकडून योग्य संस्कार नसणे हेच म्हणावे लागेल !

भ्रष्टाचाराचे ‘चित्रां’कन !

चित्रा रामकृष्ण यांनी स्वतःची कुशाग्र बुद्धी आणि क्षमता विधायक कार्यासाठी न वापरता विघातक कामांसाठी वापरली. असे ‘बुद्धीवान’ भ्रष्टाचारी हे भारतीय व्यवस्थेसाठी अधिक धोकादायक आहेत, हे लक्षात घ्या !

वैद्यकीय शिक्षणातील अडचणी !

भारतातील वैद्यकीय शिक्षणाची ही स्थिती युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे प्रकर्षाने लक्षात येत आहे. भारतात पूर्वापार आयुर्वेदाचे शिक्षण मिळत आहे; मात्र त्याच्याकडे आणि अन्य वैद्यकीय शाखांच्या अभ्यासक्रमांकडे कुत्सित दृष्टीने पाहिले जाते.

समाजहित साधणारे राजकारणी हवेत !

सध्याचे राजकारणी जे राजकारण करतात, त्यात समाजहित अल्प आणि स्वहित अधिक असते. राजकारण करण्यामागील समाजहिताची भावना बहुतांश राजकारणी विसरले आहेत. लोकशाही खर्‍या अर्थाने सुदृढ करायची असेल, तर समाजहितासाठी राजकारण करणारे शासनकर्ते असणे आवश्यक आहे.

मंदिरांचे सरकारीकरण थांबवा !

वारंवार मागणी करूनही मंदिरांचे सरकारीकरण काही थांबत नाही. भाजप सत्तेत असलेल्या राज्यांतही मंदिरांचे सरकारीकरण होते, हे हिंदूंना रूचलेले नाही. त्यामुळे केंद्रीय स्तरावरच कायदा करून मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने हे लक्षात घेऊन यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे !

मंगलमय स्वस्तिक !

स्वस्तिकच्या प्रकरणात हिंदूंनी वेळीच आवाज उठवला नसता, तर कॅनडामध्ये त्याच्यावर बंदी घातली गेली असती. जागतिक पातळीवर हिंदूंना त्यांच्या अधिकारांसाठी वेळोवेळी लढावे लागते; मात्र हिंदूंमध्ये शुभ आणि मंगलमय असलेल्या स्वस्तिकसाठी हिंदूंनी वैध मार्गाने दिलेला लढा हा नक्कीच आशादायी होता !

कलुषित ‘व्हिजन’ !

आपला देश किती सामान्य होता आणि आलेले आक्रमकच कसे महान होते ? हे शिकवणारा अन् असली शिकवण ऐकून घेणारा एकमेव देश भारत ! शिक्षक सांगतील, त्यावर विश्वास ठेवायला स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीही फार लहान नसतात. त्यानीच याचे खंडण करून वाचा फोडली तर हे अपप्रकार रोखण्यास साहाय्य होणार आहे !