Diwali : बलीप्रतिपदेच्या दिवशी दिले जाते दीप आणि वस्त्रे यांचे दान !
बलीप्रतिपदेच्या दिवशी भूमीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात.