देवाने आपल्‍या मनात प्रज्‍वलित केलेल्‍या राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या कार्याच्‍या ज्‍योतीने अज्ञानाच्‍या अंधःकारात असलेल्‍या समाजाला दिशा देण्‍याचे कार्य करूया !

दिवाळीच्‍या दिवसांमध्‍ये श्रीगुरूंना अपेक्षित असे घडण्‍यासाठी संकल्‍प करून सातत्‍याने प्रयत्न करूया. हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना हे गुरुमाऊलीने दिलेले समष्‍टी ध्‍येय आहे. सध्‍या राष्‍ट्र आणि धर्म यांची स्‍थिती बिकट आहे. राष्‍ट्राला अवकळा प्राप्‍त झाली आहे. ही स्‍थिती पालटायला हवी. दिवाळीच्‍या आधी आपण घराची स्‍वच्‍छता करतो, तोरणे लावतो, रांगोळ्‍या काढतो आणि पणत्‍या लावतो. ही सिद्धता कशासाठी ? केवळ दिवाळीसाठी. तसेच राष्‍ट्र-धर्मावर आलेली जळमटे आणि धूळ काढून हिंदु राष्‍ट्र येण्‍यातला आनंद घ्‍यायचा आहे. देवाने आपल्‍या मनात राष्‍ट्र-धर्माच्‍या कार्याची ज्‍योत प्रज्‍वलित केली आहे. त्‍या पणतीने अज्ञानाच्‍या अंधःकारात असलेल्‍या समाजाला दिशा देण्‍याचे कार्य तोच करवून घेत आहे. देवाने त्‍याच्‍या कार्यासाठी आपल्‍याला माध्‍यम केले आहे. यासाठी त्‍याच्‍या चरणी कृतज्ञताभावात राहून झोकून देऊन सेवा आणि साधना करूया; म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राची पहाट कधी झाली, हे आपल्‍याला कळणारही नाही.

– सौ. स्‍वाती शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.